शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंध शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच अंध शेतकऱ्याचा बैल सर्पदंशामुळे ...

ठळक मुद्देसर्पदंशाने बैल दगावला : शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही फायदा नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशातच अंध शेतकऱ्याचा बैल सर्पदंशामुळे दगावला. आपल्याला शासकीय मदत मिळावी यासाठी त्या शेतकऱ्यांने शासनाच्या विविध कार्यालयात उंबरठे झिजविले. परंतु, शासकीय मदत न मिळाल्याने या दिव्यांग शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन पाठविले आहे.प्राप्त माहीतीनुसार, शेतकरी वसंतराव बगुलकर हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. त्याचेकडे तीन एकर शेती असून मुलगा नितीन याच्या आधाराने ते शेतजमीन करून आपला उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी या शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही. अशातच हवालदील झालेल्या या शेतकºयाच्या मालकीचा एक बैल सर्पदंशाने दगावला.बैलाचे शवविच्छेदन झाले. शिवाय पंचनामाही करण्यात आला. बैल दगावल्यामुळे शासकीय मदत मिळावी या उद्देशाने सदर कागदपत्रांसह इतर आवश्यक कागदपत्रे जोडून रितसर प्रस्ताव तहसीलदारांसह वनविभागाला देण्यात आला. परंतु, सदर अधिकाºयांनी नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई यादीत सर्पदंशाचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे कारण पुढे करून या अंध शेतकऱ्याच्या अडचणीत भर टाकली आहे.शिवाय त्याला अद्यापही शासकीय मदत मिळालेली नाही. आपल्याला न्याय मिळावा या हेतूने या शेतकºयाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनावरून आता काय कार्यवाही होते, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.सर्पदंशाने मृत्यू हे प्रकरण नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नसल्याने महसूल विभागामार्फत शासकीय मदत दिली जात नाही. महसूल विभाग केवळ पंचनामा करतो. त्याचा फायदा वनविभागाकडून शासकीय मदत मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्याला होतो. पारडी येथील वसंतराव बगुलकर यांच्या मालकीच्या मृत बैलाचा पंचनामा महसूल विभागाने केला. पुढील बाब वनविभागाची आहे.- सचिन कुमावत, तहसीलदार, कारंजा (घा.)

टॅग्स :Farmerशेतकरी