शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपाला नव्हे तर नियोजित जागेला भाजपचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

पोलीस वेल्फेअरद्वारे होणाऱ्या पेट्रोलपंपाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसून ज्या ठिकाणी हा पेट्रोलपंप उभारला जात आहे तो परिसर आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. शिवाय त्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक आंदोलने होतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नाही तर नियोजित जागेला भाजपचा विरोध आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिव्हील लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोलीस वेल्फेअरद्वारे पेट्रोलपंप तयार करण्यात येत आहे. पोलीस वेल्फेअरद्वारे होणाऱ्या पेट्रोलपंपाला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसून ज्या ठिकाणी हा पेट्रोलपंप उभारला जात आहे तो परिसर आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. शिवाय त्या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक आंदोलने होतात. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा. पोलिसांच्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नाही तर नियोजित जागेला भाजपचा विरोध आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे म्हणून तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट करून घेतले. सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्याने सध्या या परिसराचा चेहरा बदलला आहे. पोलीस वेल्फेअरद्वारे पेट्रोलंपपासाठी नाहरकत प्रमाणपत्र घेत असताना सर्व विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचीही एनओसी घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, तसे झालेले नाही. भविष्यात डॉ. आंबेडकर चौकात होणाऱ्या सामाजिक, राजकीय, समाजप्रबोधन कार्यक्रमांना या पेट्रोलपंपामुळे नक्कीच बाधा होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलपंपाची जागा तातडीने बदलण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. पंकज भोयर, किशोर दिघे, प्रमोद राऊत, मिलिंद भेंडे, प्रदीप ठाकूर, वरुण पाठक, मंजुषा दुधबडे, पवन परियाल, महेश आगे, नीलेश किटे आदींची उपस्थिती होती.

तो परिसर आंदोलनस्थळच - डॉ. गोडे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नेहमीच विविध राजकीय व सामाजिक आंदोलने होतात. अशा वेळी या परिसरात पेट्रोलपंप तयार झाल्यास या मार्गावरील रहदारी वाढेल. त्यामुळे आंदोलनांवरही मर्यादा येतील. डॉ. आंबेडकर पुतळा परिसर हा आंबेडकरी जनतेसाठी श्रद्धास्थान असून, पेट्रोलपंपाची जागा तातडीने बदलली पाहिजे, असे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी स्पष्ट केले.

पंप हटविण्याच्या मागणीला भाजपचा पाठिंबा-  भोयर- डॉ. बाबासाहेब पुतळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या पेट्रोलपंपाची जागा बदलण्यात यावी, अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी माहिती यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर व्हावा - राऊत- उभारल्या जात असलेल्या पेट्रोलपंपाला आंबेडकरी जनतेचा विरोध नाही; पण ज्या जागेवर हा पंप उभारला जात आहे, त्या जागेला विरोध आहे. आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करून पेट्रोलपंप इतर ठिकाणी हलविण्यात यावा, असे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPoliceपोलिस