शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात धुसफूस तर काँगे्रस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा आलाप

By admin | Updated: February 5, 2017 00:41 IST

कन्नमवारग्राम हा जिल्हा परिषद मतदार संघ खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झाला आहे.

बाबाराव अंबुलकर  कन्नमवारग्राम कन्नमवारग्राम हा जिल्हा परिषद मतदार संघ खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झाला आहे. कुंडी पंचायत मतदार संघ महिला खुला तर तर कन्नमवारग्राम पं.स. गण अनु. जातीकरिता राखीव आहे. या मतदार संघामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघातून निवडून गेलेले उमेदवार जिल्हास्थळी सभापतीही झाले. तीन माजी सभापती कन्नमवारग्रामचे रहिवासी होते. पाच वर्षांपूर्वी झालेली जि.प. निवडणूक अटीतटीची झाली होती. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारोतराव व्यवहारे यांना निसटता विजय मिळाला होता. त्यावेळी भाजपकडून मिठालाल चोपडे व राष्ट्रवादीकडून विजय गाखरे, हे रिंगणात होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारीची धुरा माजी सभापती प्रवीण गांधी यांनी सांभाळली होते. यामुळे १०० मतांनी उमेदवार पराभूत झाला; पण आता या मतदार संघातील विजय गाखरे यांनी भाजपात प्रवेश घेऊन पत्नीसाठी पक्षाकडून उमेदवारी प्राप्त केली आहे. मागील निवडणुकीत काँगे्रसचे एकनिष्ठ मारोतराव व्यवहारे यांच्या पत्नीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांसह इतर पक्षाचे व अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत; पण खरी लढत भाजपच्या जि.प. गटाच्या उमेदवार सारिका विजय गाखरे व काँग्रेसचे विद्यमान सदस्य मारोतराव व्यवहारे यांच्या पत्नी निलीमा मारोतराव व्यवहारे यांच्यातच रंगणार आहे. पंचायत समिती मतदार संघातील कुंडी गणामधून नव्यानेच लढत असलेल्या भाजपच्या ज्योत्सना दिनेश ढोबाळे या रिंगणात आहेत. काँग्रेसच्यावतीने रेखा डोंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्नमवारग्राम पं.स. गणाकरिता भाजपतर्फे आम्रपाली मुकेश बागडे तर काँग्रेसतर्फे इंदिरा सुनील गजभिये तथा अपक्ष मंदा वासुदेव मेश्राम यांच्यातच लढत रंगणार आहे. असे असले तरी मतदार मात्र संभ्रमात आहे. या निवडणुकीत कन्नमवारग्राम मतदार संघात सर्वच पक्षांनी उमेदवारी नाकारलेल्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नवीन कार्यकर्त्यांमुळे भाजपात कलह माजलेला आहेत. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर नसला तरी उमेदवारांबद्दल नकारात्मकता दिसून येत आहे; पण काँग्रेस पक्षाच्या नेहमीच्या परंपरेनुसार शेवटच्या क्षणी सर्वच कार्यकर्ते एकच काम करतील , अशी सर्वांची अपेक्षा आहे. आज भाजपातील धूसफुस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी कुणाला मारक ठरणार, हे चित्र काहीच दिवसांत स्पष्ट होणार आहे.