शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सर्वसामान्यांचा पक्ष; कर्तृत्ववानाला मिळते संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:07 IST

सहा दशक सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकांरला बाजूला सारत पाच वर्षात केलेला विकास कामांमुळे मतदारांनी भाजपाला दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. यात कर्तृत्ववान व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदापासून मोठी पदेही दिली जातात; परंतु काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे असेल तर गांधी घराण्यातच जन्म घ्वावा लागेल,.....

ठळक मुद्देरामदास तडस : विविध सामाजिक व राजकीय संस्थांंद्वारे नागरी सत्कार व युथ कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : सहा दशक सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकांरला बाजूला सारत पाच वर्षात केलेला विकास कामांमुळे मतदारांनी भाजपाला दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. यात कर्तृत्ववान व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदापासून मोठी पदेही दिली जातात; परंतु काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे असेल तर गांधी घराण्यातच जन्म घ्वावा लागेल, अशी घणाघाती टीका खासदार रामदास तडस यांनी केली.येथील मातृसेवा सभागृहात विविध सामाजिक व राजकीय संस्था तसेच भारतीय जनता पार्टीव्दारे खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार, युथ कार्यकर्ता मेळावा आणि ईद-मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामदास आंबटकर तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगराध्यक्ष शितल गाते, भाजपा ओ.बी.सी. मोर्चाचे प्रदेश सरचिटीस संजय गाते, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलींद भेंडे, भाजपा जिल्हा चिटणीस नितीन बडगे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष आशिष गांधी यांची उपस्थिती होती.सत्काराला उत्तर देताना खासदार तडस म्हणाले, भाजपा हा कुण्या एका जाती, धर्म व पंथाचा पक्ष नाही; तो सर्वसामान्य माणसाचा गरीब शेतकºयांचा पक्ष आहे. देशातील १ लाख ४० कंपण्या बंद पडलेल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करून बेरोजगारांच्या हाताना काम, शेतकºयांच्या शेताला पाणी व शेतमालाला योग्य भाव देवून भाजपा सरकार एक नविन राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे. स्थानिक खत कारखाना बंद पडलेला आहे. तो अधिक चांगल्या प्रकारे सुरू करून शेकडो बेरोजगारांना रोजीरोटी देण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेस सरकाने सहा दशकाच्या कालावधीत शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या तसेच बेरोजगारीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केवळ गांधीजींचे नाव पुढे करुन आपले घर भरण्याचे काम केले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिल्लीच पार्सल दिल्लीला पाठविलं. आता विधानसभेत हैद्राबादचही पार्सल परत पाठवा, असे आवाहन खासदार तडस यांनी केले.यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. आंबटकर म्हणाले की, भाजपाच्या विजयात सर्वात मोठा वाटा आजच्या तरूणाईचा आहे. या सरकार पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छ व समृध्द भारताचा संदेश आहे. तोच संदेश घेवून भाजपा सरकार एक स्वच्छ व समृध्द भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. याप्रसंगी संजय गाते, नितीन बडगे, राजेश बकाने यांनीही मार्गदर्शन केले. तसेच ईद-मिलन कार्यक्रमाप्रसंगी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर खासदार तडस यांचा भाजप नगर परिषद तसेच सर्व सामाजिक व राजकीय संस्था तसेच भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी, उत्तर भारत समाज, पतंजली योग समिती, यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळा व मेळाव्याला नोमान अली बोहरा, अ‍ॅड. अजय तिवारी, राजीव बत्रा, गटनेता राजीव जयस्वाल, मनोज वालदे, युसूफभाई, शकील भाई, विठ्ठल वानखेडे, नलिनी ढोबळे, मंगला राठी, गणेश ऐतवान, नगरसेविका माधुरी इंगळे, नगरसेवक भगवान भंडारकर, सभापती पूनम सावरकर, अविनाश भोपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आकाश दुबे यानी केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसBJPभाजपा