शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

सायकल यात्रेने ‘नो व्हेईकल डे’ची जनजागृती

By admin | Updated: January 1, 2016 03:18 IST

पर्यावरणाबाबत ‘लोकमत’ने मांडलेली संकल्पना व भूमिकेचा अंगिकार करीत देवळीकरांनी पहिल्या गुरूवारी ‘नो व्हेईकल

अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा समावेश : वर्धेत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची सायकलिंगदेवळी : पर्यावरणाबाबत ‘लोकमत’ने मांडलेली संकल्पना व भूमिकेचा अंगिकार करीत देवळीकरांनी पहिल्या गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’चे उत्स्फूर्त स्वागत केले. खा. रामदास तडस यांचा पुढाकार व न.प. च्या सहकार्यातून सकाळी ८ वाजता सायकलची जनजागृती रॅली काढण्यात आली. या सायकल यात्रेच्या माध्यमातून ‘नो व्हेईकल डे’बाबत जनजागृती करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या सायकल यात्रेत शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, औद्योगिक वसाहतीतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांचा सहभाग होता. नगराध्यक्ष शोभा तडस व तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेमिला ढोक, नगरसेवक माला लाडेकर, जनता कनिष्ठ महा.च्या प्राचार्य संध्या कापसे व महिला पदाधिकारी उपस्थित होते. ‘नो व्हेईकल डे’च्या निमित्ताने शहरात उत्सूकता व कुतूहलाचे वातावरण होते. महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्साह अलौकिक होता. शहरातील रस्ते व गल्लीबोळातून खा. तडस सायकल चालवित असल्याचे पाहुन नागरिकांनाही आश्चर्यच वाटले. या रॅलीत स्वत:च्या सायकलसह परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एम. दिदावत, मोहन गुजरकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, डॉ. श्रावण साखरकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे, न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, शिक्षण सभापती विलास जोशी, बांधकाम सभापती दिलीप कारोटकर, नगरसेवक कृष्णा शेंडे, अब्दुल नईम, न.प. माध्यमिकचे मुख्याध्यापक भास्कर जुनेवार, प्रा. पंकज चोरे, प्रा. आचार्य, विविध कार्यकारीचे अध्यक्ष शरद आदमने, किरण तेलरांधे, महालक्ष्मी स्टीलचे प्रजावीर आचार्य, प्रकाश दुधकोहळे, देवानंद उराडे, आरोग्य विभागाचे विजय चिंचोळकर, प्रवीण चिंचुलकर, बबीता ताकसांडे, प्रवीण फटींग, आशीष इटनकर, शरद सातपुते, विष्णू कापसे, सुरेंद्र उमाटे, पोलीस कर्मचारी, महालक्ष्मी स्टीलचे कामगार, जनता कनिष्ठ महाविद्यालय व न.प. कनिष्ठ महा.चे विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. सायकल रॅलीचा समारोप न.प. कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी आयोजित सभेत खा. रामदास तडस व तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी विचार व्यक्त केले. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.(प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श ‘नो व्हेईकल डे’४जिल्हाधिकाऱ्यांचा ‘नो व्हेईकल डे’ खरोखरच आदर्श ठरला. सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या जनजागृती रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला. यानंतर सकाळी त्यांनी निवासस्थानावरून आपल्या गार्डसह पायी येत कार्यालय गाठले. शिवाय दिवसभर बाहेरचा एकही दौरा न ठेवता केवळ कार्यालयील कामकाज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ४जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीही सकाळी रॅलीत सहभाग घेतला; मात्र त्यांना नागपूर येथे काही कामानिमित्त जायचे असल्याने ते कार्यालयात पायी आले नाही. ४अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांनी निवासस्थानाहून पायी येत कार्यालय गाठले. त्यांनी कामाच्या गरजेनुसार वाहन वापरण्यात येईल, असे सांगितले. वर्धेत दुसऱ्या गुरूवारीही जनजागृती ४‘लोकमत’ने घेतलेल्या इनिशिएटीव्हला वर्धेत बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही नो व्हेईकल डे बाबत सकारात्मक भूमिका घेतली. दुसऱ्या गुरूवारीही वर्धेत एक दिवस वाहने न वापरण्याबाबत जनजागृती सायकल यात्रा करीत जनजागृती केली.