शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांनंतर सायकली व मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:44 IST

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले.

ठळक मुद्देपुन्हा लेटलतीफीचा उच्चांक : समुद्रपूर पंचायत समितीचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. या पंचायत समितीमध्ये सध्या साहित्य वाटपाच्या लेटलतीफिचा मुद्दा अत्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वीही लाभार्थ्यांना दहा वर्षे जुने साहित्य वाटण्यात आले.सन २०१२-१३ ते २०१६-१७ ग्रामीण भागातील महिलांना शिवण यंत्र, सौरकंदील पुरविणे तसेच मुलींना लेडीज सायकल पुरविणे या योजनेअंर्गत शिल्लक असलेले साहित्य नवीन लाभार्थ्यांना मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. पंचायत समिती समुद्रपूरस्तरावर महिला व बालकल्याण विभागाचे शिल्लक असलेले साहित्य वाटप करण्याबाबत सर्वसाधारण सभेत २४ मे २०१८ ला ठराव महिला बालकल्याण समितीने मंजूर केला. तसेच सौर कंदील व शिलाई मशिन लाभार्थ्यांकडून १० टक्के हिस्सा रक्कम जमा करून वाटण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यानुसार हे साहित्य २७ जुलै रोजी देण्यात आले. पाच वर्षांपासून आलेले साहित्य इतक्या विलंबाने वाटप करण्याचे कारण काय? असा प्रश्न लाभार्थ्यांनाही पडला आहे. अनेक लाभार्थ्यांना जंगलेल्या सायकली, मशिनी वितरीत करण्यात आल्या.सौर कंदीलाचे सर्वाधिक लाभार्थीएकूण आठ लाभार्थ्यांना लेडीज सायकल देण्यात आल्या. तसेच ३७ लाभार्थ्यांना सौर कंदील वितरीत करण्यात आले. तर १७ लाभार्थ्यांना शिलाई मशिन वितरीत करण्यात आली. यामध्ये एस.टी. एस.सी. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असून या लाभार्थ्यांना ज्या वस्तू वितरीत करण्यात आल्या. त्या मागील सहा वर्षांपासून पंचायत समितीत पडून होत्या. त्यामुळे त्या साफ करून गावाकडे त्यांना न्याव्या लागल्या.२०१२-१३ या कालावधीत मंजूर झालेले साहित्य वाटप करण्यात त्या वेळीचे जि.प. सदस्य व अधिकारी यांनी संगणमत करून लाभार्थ्यांना पाच वर्ष साहित्यापासून वंचित राहिले. याबाबत संबंधितावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.रोशन चौके,जि.प. सदस्य, कोरा सर्कलप्रशासन झोपले होते का ? लाभार्थ्यांचा सवालपाच ते दहा वर्षांपासून पंचायत समितीत साहित्य पडून होते. लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम केल्यानंतर लाभार्थ्यांना ते वितरीत करणे पंचायत समितीचे काम आहे. येथे मात्र समाजकल्याण विभागाच्या योजनांचे साहित्य १० वर्षांनंतर वितरित केल्याचा प्रकार घडला. आता पुन्हा महिला बाल कल्याण विभागाचे साहित्यही सहा वर्षांनंतर वाटप करण्यात आले. गोदामात असलेल्या या साहित्याची माहिती जि.प. व पं.स.च्या प्रशासनाला नव्हती का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भंगार साहित्य लाभार्थ्यांना वितरीत करणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई व्हायलाच हवी. ज्या मुलींना सायकली मिळाल्या त्यांना कापडाने पुसून त्या न्याव्या लागल्या. आईवडील सोबत होते. सायकलची अवस्था पाहिल्यावर त्याच्याही भावना तीव्र होत्या. एवढ दिवस विलंब का असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाgovernment schemeसरकारी योजना