शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजन झाले, कामाला सुरुवात कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:34 IST

विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे बोर तिरावर घाट बांधकामाचे भूमीपूजन होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला. प्रत्यक्ष कामाला काही सुरूवात होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देअडीच महिन्यांचा कालावधी लोटला : निधी उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र घोराड येथे बोर तिरावर घाट बांधकामाचे भूमीपूजन होऊन अडीच महिन्यांचा कालावधी झाला. प्रत्यक्ष कामाला काही सुरूवात होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. या कामाची डिझाईन नागपूर येथील वास्तु विशारद बांधकाम विभागाला उपलब्ध करून देणार आहेत पण ती अजूनही देण्यात आली नसल्याने सदर काम सुरू होण्यास विलंब होत आहे, अशी माहिती मिळाली आहे.१४ फेब्रुवारीला बोर तिरावर घाटाचे बांधकाम करण्याची घोषणा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केली होती.यासाठी निधीही उपलब्ध झाल्याचे त्यावेळी सांगितले होते. येथून तब्बल सात महिन्यांनतर भूमीपूजनाचा मुहूर्त शोधला गेला पोळ्याच्या पाडव्याला १० सप्टेंबरला थाटात बोरतिराचे रूपडे पालटणारा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी तात्काळ काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देत आमदार समीर कुणावार यांना संत केजाजी महाराज पुण्यतिथीला येण्याचे निमंत्रणही देण्यात आले. पुण्यतिथी महोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक असताना घाटाच्या कामाला सुरूवात झाली नाही. २६३-६८ लक्ष रुपयाचा निधी बोरतिराचे रूपडे पालटण्यासाठी आमदार पंकज भोयर यांनी आणला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत सदर काम होणार आहे. सेलू येथील विश्रामगृहात असणाºया कार्यालयात याबाबत विचारणा करण्यास गेलो असता येथील अधिकाºयांच्या रित्या खुर्च्या पाहुण माघारी फिरण्याशिवाय पयार्य नाही. तर भ्रमणध्वनीला साद देण्याचीही तसदी अधिकारी दाखवत नाही.डिझाईनचा आराखडा रखडलाघोराड येथील मंदीर परिसराला लागून बोर नदी आहे. बोरनदीच्या घाटाचे सौंदर्यीकरण व बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना स्नान करण्यासाठी प्रसाधन गृह व शौचालयही बांधकाम होणार आहे. मात्र या सर्व बांधकामाची डिझाईन नागपूर येथून तयार करून दिली जाणार आहे. ती बांधकाम विभागाला मिळाल्यानंतर कंत्राटदार सदर काम सुरू केले जाणार आहे.मात्र अडीच महिन्याचा कालावधी लोटूनही डिझाईन मिळालेली नाही.