शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री येण्यापूर्वीच केले रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. 

ठळक मुद्देकामाला प्रारंभ : भाजप नेत्यांनी घेतले श्रेय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी : आर्वी-देऊरवाडा या रस्त्याचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार २८ डिसेंबर रोजी करणार असले तरी याच रस्त्याचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात या रस्त्याच्या विकासासाठी निधी मिळाला असल्याने पालकमंत्र्यांच्या पुर्वीच खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आणि आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरही आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. शासकीय निधी खेचून आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनीही सहकार्य केले होते. या रस्त्या लगत सुमारे दहा गावे असून त्या गावातील नागरिकांना या रस्त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कडेला असलेली विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. देऊरवाडा ते नांदपुरपर्यंत खाेदकामही करण्यात आले आहे. लवकरच हा रस्ता गुळगुळीत होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग