शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

अर्थ समितीच्या सभेला भेंडेंची हजेरी

By admin | Updated: March 9, 2016 03:02 IST

जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ च्या अर्थ संकल्पाबाबत मंगळवारी अर्थ समितीने बोलाविलेल्या सभेला न्यायालयीन परवानगी ..

चार तास जिल्हा परिषदेत : पदमुक्तीबाबत जिल्हा परिषदेचे मौनवर्धा : जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ च्या अर्थ संकल्पाबाबत मंगळवारी अर्थ समितीने बोलाविलेल्या सभेला न्यायालयीन परवानगी घेऊन कारागृहात असलेले शिक्षण व आरोग्य समिती सभापती मिलिंद भेंडे यांनी हजेरी लावली. तब्बल चार तासांचा वेळ त्यांनी जिल्हा परिषदेत घालवला. सभापती म्हणून भेंडे यांनी २०१५-१६ च्या अंदाजपत्रकापेक्षा २०१६-१७ च्या शिक्षण विभागाच्या अंदाजपत्रात ४९ लाख ६१ हजार २०० वरुन ५१ लाख ४१ हजार ३०० रुपयांची वाढीव तरतूद केल्याचे प्रसिद्धपत्रकही काढले आहे. ३० दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असतानाही भेंडे यांनी या सभेला हजेरी लावली हे विशेष. यावेळी त्यांच्या हजेरीवरुन विरोधी पक्षांनीही विरोध दर्शविला नाही. वास्तविक, भेंडे यांना अटक झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या कक्षसमोरील नामफलकाला काळे फासत राजीनाम्याची मागणी केली होती. आजच्या सभेत काँग्रेससह विरोधी गटातील मंडळी जिल्हा परिषदेत गोंधळ माजवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे; मात्र एकाही विरोधी सदस्यांनी विरोध न दर्शविल्यामुळे केवळ औपचारिकतेपुरताच विरोध होता, हे दिसून आले. नियोजित वेळेनुसार अर्थ व नियोजन समिती सभापती विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पावरील सभेला सुरुवात केली. अर्थसंकल्प कसा असावा, कोणत्या बाबींना विशेष महत्त्व द्यावे, या विषयांवर साधकबाधक चर्चा झाली. विषय समित्यांच्या सभापतींनी आपापल्या विभागाचे प्रस्ताव यावेळी सादर केले.(जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा परिषदेची चुप्पी३० दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर असलेला सभापती आपोआप पदमुक्त होतो, याबाबत जिल्हा प्रशासन मौन बाळगून होते. मिलिंद भेंडे यांनी पोलीस बंदोबस्तात जिल्हा परिषदेतील आपल्या कक्षातील खुर्ची सांभाळली. यानंतर अर्थ समितीच्या सभेला हजेरी लावली. यावेळी जिल्हा परिषद प्रशासन वा जि.प. अध्यक्षांकडून त्यांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही, हे विशेष.पदमुक्ती शक्यच नाही - मिलिंद भेंडे३० दिवस गैरहजर असल्यास पदमुक्त होते, असे जिल्हा परिषदेच्या नियमावलीत नमुद असले तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अशाच एका निकालानुसार पदमुक्त होत नाही. तसेही २९ फेब्रुवारी रोजी जि.प. अध्यक्षाकडे सुटीचा अर्ज सादर केलेला आहे. यावर त्यांनी स्थायी समितीने निर्णय घेणे अपेक्षित होते, ही बाब मिलिंद भेंडे यांनी सभेपूर्वी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.‘त्या’ आरोपांचे समर्थन करुच शकत नाही- रणनवरेजे आरोप मिलिंद भेंडे यांच्यावर ठेवण्यात आले आहे. ते गंभीर आहे. एक महिला या नात्याने या आरोपाचे समर्थन करुच शकत नाही. भेंडे यांनी जिल्हा परिषदेला सुटीचा अर्ज दिला असला तरी येत्या १५ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेतील स्थायी समितीच्या सभेत व्यक्तिश: तो अर्ज नामंजूर करणार आहे. समितीचे सदस्य या सभेत या अर्जावर सर्वानुमते निर्णय घेतील, अशी माहिती जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.