सुधाकर गायकवाड, व्यंकप्पा भोसले, चैत्रा रेडकर ठरले मानकरीवर्धा : यशवंतराव दाते स्मृती संस्था व भोेळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी डॉ. भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार वितरण समारोह पार पडला. यात ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक नंदा खरे यांच्या हस्ते ग्रंथकार सुधाकर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले व चैत्रा रेडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहातील समारोहाला अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विजया भोळे उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भोळे यांच्या स्मृत्यर्थ रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप होते. वैचारिक ग्रंथ पुरस्कार पनवेल, मुंबईचे आंबेडकरी विचारवंत सुधाकर गायकवाड यांना माणूस, त्याचा समाज व बदल या ग्रंथाकरिता प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार व्यंकप्पा भोसले कोल्हापूर यांना तर डॉ. यशवंत सुमंत स्मृती प्रेरणा पुरस्कार डॉ. चैत्रा रेडकर मुंबई यांना देण्यात आला. समारोहाला किशोर बेडकिहाळ, अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, प्रा. राजेंद्र मुंढे, हिरण्मय भोळे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रदान
By admin | Updated: December 27, 2015 02:28 IST