शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरची अमृता पुजारी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 23:25 IST

देवळी येथे राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण

देवळी (वर्धा) : अतिशय चुरशीच्या लढतीत भाग्यश्री फंड (पुणे जिल्हा) हिने महिला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला. उपविजेती अमृता पुजारी (कोल्हापूर) ठरली. ही लढत ४ विरुद्ध २ अशा गुणांनी भाग्यश्रीने जिंकली. दोन्ही मल्लांनी डावपेचांची उधळण केली. बांगडी, पट, ढाग, कलाजंग आदी डाव वापरले. तिसऱ्या स्थानासाठी वेदिका सारने (कोल्हापूर शहर), तर चतुर्थ स्थान ज्योती यादव (जळगाव) यांनी प्राप्त केले.

देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता, तसेच उपविजेता पदाची लढत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वेळेत झालेल्या राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील इतर विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस, आमदार राजेश बकाने, आमदार प्रताप अडसड, आमदार सुमित वानखेडे, आमदार यावलकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी. क्रीडा भारती जयपूरचे प्रसाद महानकर, हिंदकेसरी योगेश दोडके आदींच्या हस्ते या स्पर्धेतील वेगवेगळ्या वजनी गटांत प्रथम व द्वितीय ठरलेल्या पहेलवानांचा सुवर्ण व रौप्य पदक देऊन सन्मान करण्यात आला.

शुक्रवारपासून देवळी येथे महिला मल्लांच्या डावपेचांची उधळण झाली. क्रीडाप्रेमींना कुस्तीची मेजवानी मिळाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपअधीक्षक राहुल चव्हाण, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, एसडीओ दीपक कारंडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, मुख्याधिकरी विजय आश्रमा, प्रा. नरेंद्र मदनकर, नंदू वैद्य, संजय तिरथकर, मदन चावरे, नाना ढगे, शुभांगी कुर्जेकर, उपअभियंता व्यास, डॉ. दिदावत, डॉ. लांडे यांची उपस्थिती होती.

या महिला कुस्तीपटूंनी मारली बाजीराज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून सुवर्ण व रौप्य पदाच्या मानकरी ठरलेल्या महिला कुस्तीगिरांचा सन्मान करण्यात आला. यात ५० किलो वजनी गटात प्रथम नंदिनी साळोखे (कोल्हापूर जिल्हा), द्वितीय रीया ढेंगे (कोल्हापूर शहर), ५३ किलो वजनी गट प्रथम स्वाती शिंदे (कोल्हापूर जिल्हा), द्वितीय ज्ञानेश्वरी पायगुडे (पुणे शहर), ५५ किलो प्रथम सिद्धी ढमढेरे (पुणे शहर), द्वितीय साक्षी चंदनशिवे (सांगली), ५७ किलो प्रथम तन्वी मगदूम (कोल्हापूर जिल्हा), द्वितीय अश्लेषा बागडी (सोलापूर जिल्हा), ५९ किलो प्रथम धनश्री फंड (अहिल्यानगर), द्वितीय गौरी पाटील (कोल्हापूर शहर), ६२ किलो प्रथम वैष्णवी पाटील (कल्याण), द्वितीय संस्कृती मुमुळे (सांगली), ६५ किलो प्रथम सृष्टी भोसले (कोल्हापूर शहर), द्वितीय सुकन्या मिठारी (कोल्हापूर जिल्हा), ६८ किलो प्रथम शिवानी मेंटकर (कोल्हापूर शहर), द्वितीय शिवांजली शिंदे, ७२ किलो प्रथम वैष्णवी कुशाप्पा (कोल्हापूर शहर), द्वितीय गौरी धोटे (अमरावती) यांचा समावेश आहे.