वर्धा : शहरातील मध्यवस्ती व मुख्य मार्गावरील पथदिवे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होते. हे पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असल्याने वीजेचा यातून अपव्यय होत होता. मात्र याकडे संबंधित विभागाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. यातील उर्वरित पथदिवे दिवसभर सुरू असल्याने नागरिकांत विविध चर्चांना उधाण आले होते. पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे काही नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. यातही शहरातील मुख्य मार्ग तसेच मध्यवस्तीतील पथदिवे दिवसाही सुरू असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. एरवी सकाळी ७ वाजताच्यापूर्वी सर्व पथदिवे बंद केले जातात. मात्र मुख्य मार्गावरील मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेले हे पथदिवे बुधवारी दुपारपर्यंत सुरूच असल्याने विजेचा अपव्यय झाला.(स्थानिक प्रतिनिधी)
भरदिवसा पथदिवे सुरू
By admin | Updated: August 6, 2015 00:33 IST