शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

धाम नदीला बेशरमचा विळखा

By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST

जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले;

स्वच्छता अभियान कागदावरच : जलसाठ्यावरही संकटवर्धा : जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले; पण या दोन्ही योजना जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे वास्तव आहे. यामुळेच जनतेची तृष्णा भागविणाऱ्या वर्धा, वणा, धाम व अन्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. धाम नदीच्या पात्रात तर सर्वत्र बेशरमचेच राज्य असल्याचे दिसून येते.केंद्र शासनाच्यावतीने नद्या स्वच्छ करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले होते. गंगा नदी स्वच्छ करीत असतानाच या अभियानाचा बोजवारा उडाला. यानंतर राज्यात जलस्त्रोत बळकट करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच तलावाच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांत नाला सरळीकरणाची कामे करण्यात आली; पण कुठेही नद्यांच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. धाम नदीच्या स्वच्छतेकरिता पवनार ग्रा.पं. ने पुढाकार घेतला; पण तोही औटघटकेचाच ठरला. वर्धा नदीच्या स्वच्छतेची मोहिमही हाती घेतली होती; पण त्याचाही बोजवाराच उडाला. खरांगणा (मो.) येथेही धाम नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला; पण तोही अपूराच ठरला. किमान जिल्ह्यातील मुख्य नद्या स्वच्छ होणे गरजेचे असताना प्रशासकीय स्तरावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. पाटबंधारे विभाग जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याचे दिसते. नदी स्वच्छता अभियान राबविताना सामूहिक प्रयत्न गरजेचे असताना त्या दृष्टीने कुणीही विचार करताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यातील नद्यांचे पात्र बकाल झाले आहे. याकडे लक्ष देत पुढाकार घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दूषित पाण्याचा होतो पुरवठाधाम नदी ही जिल्ह्यातील बहुतांश भागाची तहाण भागविणारी नदी म्हणून ओळखली जाते. पिपरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी येळाकेळी आणि पवनार येथील पम्प हाऊस येथून पाणी घेतले जाते. शिवाय यात वर्धेत जलशुद्धीकरण केंद्र असले तरी अनेक गावांतही याच नदीतील पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे ग्रामस्थांना बेशरम, लव्हाळ्यांसह अन्य वनस्पतींमुळे दूषित झालेले पाणीच पिण्याकरिता वापरावे लागते. किमान गाव, शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तरी आपापल्या क्षेत्रात येणारे नदी पात्र स्वच्छ केले तर संपूर्ण नदी स्वच्छ होण्यास वेळ लागणार आहे. यासाठी कुणी एकाचा पुढाकार गरजेचा आहे.