शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांनो सावधान! रोज 250 बसेसची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींंमुळे रापमला तोटा सहन करावा लागतो. याच फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वर्ध्याच्या रापम विभागाने कंबर कसली असून, तब्बल दहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज किमान २५० बसेसची तपासणी केली जात आहे.जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही दहा पथके प्रत्येक दिवशी किमान २५० बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. 

तीन दिवसात १ हजार बसेसची तपासणी

फुकट्या प्रवाशांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे.जिल्ह्यात सध्या विशेष मोहीम राबवून बसमधील प्रवासी विना तिकीट तर प्रवास करीत नाही ना, याची पडताळणी केली जात आहे.मागील तीन दिवसात १ हजाराहून अधिक बसेसची तपासणी या दहा पथकांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंडमोटार वाहन कायदा १९८८ अन्वये विना तिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येते. त्यामुळे बसमध्ये चढताच तिकीट काढून त्याचे प्रवास संपेपर्यंत जतन करणे क्रमप्राप्तच आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एका दिवशी किमान २५० बसेसची तपासणी ही पथके करीत आहेत. प्रवाशांनीही बसमध्ये चढताच तिकीट घ्यावे, तसेच प्रवास संपेपर्यंत त्यांच्याजवळील तिकिटाचे जतन करावे.- विजय धायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रा.प.म. वर्धा.

 

टॅग्स :state transportएसटी