शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खवा व पनीरपासून व्हा सावध; घरच्याघरी अशी ओळखा भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:05 IST

Wardha News भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.

ठळक मुद्देसेवन केल्यास होऊ शकतो पोटाचा त्रास

वर्धा: दिवाळीच्या औचित्य साधून मिठाईच्या मागणीत वाढ होते; पण याच संधीचे सोने भेसळखोर करीत असून, भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.विविध मिठाईची निर्मिती करताना खव्याचा वापर केला जातो. तर काही व्यक्ती पनीरचे विविध खाद्यपदार्थ तयार करतात. पण भेसळयुक्त खव्यासह पनीर मनुष्याच्या आरोग्यासाठी हानिकारकच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मोठा नफा मिळविण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ आकर्षक दिसावे यासाठी बहुदा भेसळ केली जाते. वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत भेसळयुक्त खवा व पनीरचा वापर होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.घरच्या घरी ओळखा भेसळ खवा शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा. खव्याचा पोत दाणेदार असला, तो हातावर चोळल्यानंतर हात तेलकट झाले आणि हाताला शुद्ध तुपासारखा सुगंध आला म्हणजे खवा शुद्ध आहे हे समजावे. शुद्ध खवा ओळखण्याची दुसरी पद्धत अशी आहे की, एक चमचा खवा घ्यावा, तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकावेत. आयोडिन टाकल्याने गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावे. पनीरचा एक तुकडा घेऊन तो चोळून पाहावा. चोळल्यानंतर त्या पनीरचे लगेचच बारीक तुकडे व्हायला लागले. तर समजावे की पनीर भेसळयुक्त आहे. पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडिन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर बनावटी असल्याचे समजावे.तर वाढू शकतो पोटाचा त्रासभेसळयुक्त खवा, पनीर पदार्थ लोकांना विकणे हा गुन्हा असला तरी अनेक व्यक्ती मोठा नफा मिळविण्यासाठी भेसळीचा गोरखधंदा करतात. भेसळयुक्त खाद्यपदाथार्चे सेवन केल्यास कर्करोग, मूत्रपिंड, पोटदुखी, अपचन, त्वचेवर रॅशेस, डोकेदुखी, टायफॉइड, अल्सर यांसारखे विविध आजार नागरिकांना जडू शकतात.अन्न व औषध प्रशासन सुस्तचवर्धा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाकडे पूर्वीच मनुष्यबळाची चणचण आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील शासनाच्या या विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकडे इतर जिल्ह्याचाही प्रभार असल्याने ते मोजकेच दिवस वर्धा जिल्ह्यासाठी देतात. दिवाळीच्या तोंडावर भेसळबाजीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज असताना अन्न व औषध प्रशासन सुस्त असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.अल्प मनुष्यबळजिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अल्प मनुष्यबळ सध्या कार्यरत आहे. त्यामुळे कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शासनानेही या विभागातील रिक्त पद तातडीने भरण्याची गरज आहे.

 

 

टॅग्स :foodअन्न