शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चालकानेच केला विश्वासघात; १७.४२ लाखांचे ३० लॅपटॉप केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी  एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. आरोपी चालक व क्लिनर यांनी १३ बॉक्स हैदराबाद येथील कंपनीत उतरवून पुन्हा सील करून दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बेंगलोर येथून लॅपटॉपचे बॉक्स भरून दिल्ली येथे जात असलेल्या कंटेनर चालकासह क्लिनरनेच १७ लाख ४२ हजार २९८ रुपये किमतीचे ३० लॅपटॉप लंपास केले. ही घटना नागपूर ते हैदराबाद मार्गावर दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दारोडा टोलनाका परिसरात असलेल्या ढाबा परिसरात घडली. या प्रकरणी सतीशकुमार विद्याप्रसाद पांडे यांनी वडनेर पोलिसांत तक्रार दिली आहे.चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी  एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. आरोपी चालक व क्लिनर यांनी १३ बॉक्स हैदराबाद येथील कंपनीत उतरवून पुन्हा सील करून दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले.  मात्र, दारोडा टोल नाका परिसरात असलेल्या एका ढाब्यावर दोघेही थांबले असता त्यांना कंटेनरचे सील तुटलेले दिसून आले. याची माहिती त्यांनी सुरक्षा अधिकारी सतीशकुमार यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरची पाहणी केली असता  त्यांना १७ लाख ४२ हजार २९८ रुपये किमतीचे ३० लॅपटॉप आणि १० जुने लॅपटॉप असा एकूण १७ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलेला दिसून आला. हा सर्व मुद्देमाल आरोपी चालक आणि क्लिनर यांनी अनोळखी व्यक्तीला परस्पर विक्री केल्याच्या संशयातून सतीशकुमार यांनी वडनेर पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

टॅग्स :Thiefचोर