शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची दहशत कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:48 IST

बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी केला कोरा शिवाराचा दौरा : शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.कामगंध सापळ्यांचा वापर करा, त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत ज्या ज्या सूचना देण्यात येत आहे, त्याचे पालन करा. बोंडअळीचा आपण सामना करू शकतो असे जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांना सांगितले. एका शेतकऱ्याने याप्रसंगी म्हटले की, बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे हाल होत असून औषधी निर्माते व विक्रेते मालामाल होत आहे. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणी कोणतीही कीटकनाशके वापरली म्हणून आपण ही ती वापरावी असे करू नका तर आपल्या पिकाला कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून कीटकनाशकांचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. नारायणपूर येथील युवराज सालवरकर या शेतकºयांचे ५ एकरातील सोयाबीन शेत अळीने नष्ट केले. महागडे कीटकनाशक वापरण्याची गरज नाही तर किनालफॉस, प्रोफीनोफॉन या औषधाने या अळ्यांवर नियंत्रण मिळविता येते. त्याचप्रमाणे सोयाबीनवर असलेली बुरशी, आलेली अळी गोळा करून त्यात थोडा गुळ मिसळून पाण्यामध्ये मिश्रण करून फवारणी करावी. अळीवर आळा बसविता येते अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी यावेळी शेतकºयांना दिली. कोरा येथे शुक्रवारला कपाशी व सोयाबीन पीकावर कृषी मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.यावेळी बजरंग अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल, डॉ. विद्या मानकर, नायब तहसीलदार मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, मेश्राम, बजरंग अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजचे खरशे, कृषी पर्यवेक्षक धोटे, जि.प. सदस्य रोशन चौखे, पं.स. सदस्य वसंता घुमडे, कोराचे सरपंच अरूण चौधरी आदीशी संवाद साधला.बोंडअळी प्रादुर्भावाला ‘राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती’ घोषित करावर्धा- कपाशीच्या पिकावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदील झाला आहे. आलेल्या संकटाला ‘राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती’ घोषीत करा, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली आहे. शासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाच्या पिकावर बोंडे लागल्यानंतर बोंडअळीच्या प्रादुर्भाव झाला होता. परंतु यावर्षी खरीपाच्या हंगामात कपाशीचे झाडे पाती, फुलावर, बोंडावर आल्या पासूनच बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या झाडावर सुरुवातीच्या पाती, फुलापासूनच बोंड अळी सुरू झाली आहे. मान्सून पूर्व पेरणी, धुळ-पेरणी, पाणी पडल्यानंतर केलेली पेरणी अशाप्रकारे वेगवेगळ्या पध्दतीने केलेल्या कपाशीच्या डोबणे बोंड अळीग्रस्त झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक १०० टक्के शेतकरी असमानी संकटात सापडला आहे. शेतकºयांनी उपाय योजना करून सुध्दा बोंड अळीवर नियंत्रण मिळवता आले नाही. केंद्र व राज्य सरकारने बोंड अळीची व्याप्ती लक्षात घेता, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान पातळीचा विचार करून या संकटाला राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करावे.