शहरं
Join us  
Trending Stories
1
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
2
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
3
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
4
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
5
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
6
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
7
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
9
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
10
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
11
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
12
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
13
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
14
‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
15
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
16
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
17
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
18
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
19
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
20
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'

स्वस्त धान्याचा काळाबाजार लाभार्थी वंचित

By admin | Updated: May 8, 2014 23:55 IST

तळेगाव (श्या.) : तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याचे दिसते.

केशरी कार्डधारक वार्‍यावर

तळेगाव (श्या.) : तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याचे दिसते. महिन्याच्या शेवटी केवळ दोन-तीन दिवसांसाठीच काही धान्य दुकाने सुरू राहत असल्याने नागरिकांना स्वस्तातील धान्य मिळत नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात. यात बीपीएल, अंत्योदय, एपीएल, शुभ्र व अन्नपूर्णा असे शिधापत्रिकांचे प्रकार आहेत; पण निर्धारित वेळेवर गोरगरिब नागरिकांजवळ रोख रक्कम राहत नाही. ही दुकाने महिनाभर सुरू राहिल्यास गोरगरीबांना सवडीनुसार धान्य घेणे शक्य होणार आहे; पण असे होत नाही. बर्‍याच दुकानांत महिन्याच्या २४-२५ तारखेला धान्य मिळते.

त्यापूर्वी शिधा पत्रिकाधारक गेल्यास सरकारकडून अद्याप धान्य आले नाही, असे सांगितले जाते. काही दुकानांमध्ये हेतूपुरस्सर महिना संपायला २ ते ३ दिवसांचा अवधी असताना धान्यसाठा आणला जातो. याबाबत अन्न सुरक्षा अधिकार्‍याकडे तक्रारी केल्यास तेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. यामुळे सदर अधिकार्‍यावरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे. महिना संपताच धान्य संपल्याचे आणि मागील कोट्याचेही धान्य परत गेल्याचे सांगितले जाते. महिना संपल्यानंतर उर्वरित धान्याचा काळाबाजार केला जातो. आता लग्नसराईचे दिवस असल्याने हे धान्य सर्रास खुल्या बाजारात विकले जात आहे.

शहरातील बहुतेक स्वस्त धान्य दुकानातून धान्य नेल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नसल्याची ओरड होत आहे. महिन्याच्या शेवटी पावत्या लिहून सर्व हिशेब जुळविले जात असल्याची चर्चा नागरिकांत आहे. नागरिकांकडे शिधापत्रिका असताना शासन नियमानुसार शासनाद्वारे जाहीर दराप्रमाणे धान्य मिळणे अनिवार्य आहे. त्या भावात धान्य मिळत नसेल तर शिधापत्रिकांचा उपयोग काय, असा प्रश्न कार्डधारक उपस्थित करीत आहेत. तालुक्यात चार महिन्यांपासून येथील कार्डधारकांना धान्याचा पुरवठा होत नाही. हे धान्य मिळूनही बोगस लाभार्थ्यांच्या नावाने विकले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाचा पुरवठा अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना जानेवारी २०१४ पासून केला जात आहे; पण केशरी शिधापत्रिका धारकांना गत ४ महिन्यांत केरोसीनशिवाय कोणत्याच धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे.(वार्ताहर)