आरटीओंनी घेतली दखल : संबंधितांवर होणार कारवाईवर्धा : जिल्हा मोटार मालक संघटनेने २७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओव्हरलोड बंद करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दखल घेत ओव्हरलोड गौण खनिज वाहतूक बंद करण्याची ग्वाही दिली. यामुळे शुक्रवारी उपोषण मागे घेण्यात आले. प्रशांत पाटील व यादव कोरे या उपोषणकर्त्यांना आरटीओ विनोद जिचकार यांनी ज्यूस पाजून उपोषण सोडविले.आरटीओतर्फे ओव्हरलोड बंद करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली गेली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे यांनी ओव्हरलोड गौणखनिजाची वाहतूक बंद करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिचकार यांनी कुणीही ओव्हरलोड वाहतूक करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती चर्चेदरम्यान दिली. उपोषण मंडपाला आ.डॉ. पंकज भोयर, कंत्राटदार कल्याण समितीचे सदस्य शेखर शेंडे, सुरेश चुरा, विनोद घुग्गुसकर, विपीन पांडे, प्यारू सेठ, चांदबाबू, अजीम शेख, विशाल साठवणे, अत्ताभाई पठाण, नरेंद्र नवनागे, शैलेश चुरा, सुशील धोटे, महेंद्र ठाकूर, उमाटे यासह अनेकांनी भेटी दिल्या.(कार्यालय प्रतिनिधी)
ओव्हरलोड वाहतुकीविरूद्धचे मोटार मालक संघटनेचे उपोषण मागे
By admin | Updated: February 3, 2016 02:25 IST