शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विधीज्ञ मंडळाच्या सदस्यांशी असभ्य वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:10 IST

कार्यालयीन कामकाज करताना तहसीलदार विधी सेवा मंडळाच्या सदस्यांना असभ्यतेची वागणूक देतात,...

तहसीलदारांचा प्रताप : संतप्त वकिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कार्यालयीन कामकाज करताना तहसीलदार विधी सेवा मंडळाच्या सदस्यांना असभ्यतेची वागणूक देतात, असा ठपका ठेवत त्यांच्या विरूद्ध कारवाईचा ठराव विधी सेवा मंडळाने सोमवारी पारित केला. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदार विजय पवार यांनी विधीज्ञ मंडळाच्या सदस्यांशी काम करताना अभद्र भाषेचे वापर करीत अपमानास्पद वागणूक दिली आहे. तहसीलदार पवार यांनी विधीज्ञ मंडळाचे वरिष्ठ अधिवक्ता व्ही.टी. देशपांडे यांनाही लिला विरूद्ध गंगाधर प्रकरणात उद्धट वर्तणूक करीत युक्तीवाद दोन मिनीटात करा, दुसऱ्या कोर्टात तुम्ही अधिक युक्तीवाद करत असाल, माझ्यासमोर हे चालणार नाही, असे म्हटले. या अनुषंगाने आर्वी विधीज्ञ मंडळाच्यावतीने त्यांच्या विरूद्ध तक्रार करण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला होता; पण वेळेअभावी तक्रार नोंदविली नव्हती. शुक्रवारी विधीज्ञ मंडळाचे सदस्य रोहित राठी न्यायालयीन कामाबाबत तहसीलदार यांच्या दालनात गेले असता तुम्ही कसे काय आले, तुम्हाला कुणी बोलविले, बाहेर निघा नाही तर धक्के मारून बाहेर काढतो आणि ३५३ चा मामला दाखल करतो, असे म्हणत गैरवर्तन केले. यामुळे तहसीलदार पवार यांच्याकडे विधीज्ञांचे काम करणे कठीण झाले. याबाबत सोमवारी आर्वी विधीज्ञ मंडळाद्वारे तहसीलदार पवार यांच्या विरूद्ध कार्यवाही व्हावी म्हणून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार विजय पवार यांना त्वरित निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवून विभागीय चौकशीचे आदेश देत कायदेशीर कार्यवाही करावी. तोपर्यंत तालुक्यातील महसूल विभागाच्या सर्व कामकाजात विधीज्ञ मंडळाचे सदस्य सहभाग घेणार नाही व प्रलंबित प्रकरणे स्थगित ठेवले जातील, असेही निवेदनात नमूद केले आहे. अ‍ॅड. रोहीत राठी तारखेच्या दिवशी न येता अन्य दिवशी आले व मला माझ्या केसमध्ये काय निर्णय दिला, असे माझ्याकडे बोट दाखवित उद्धटपणे विचारल्याने हे प्रकरण वाढले आहे. नियमाचे पालन न केल्यने हे सर्व उपस्थित झाले आहे. अ‍ॅड. व्ही.टी. देशपांडे यांनीही नियमांचे पालन न करता वागणूक दिली आहे. - विजय पवार, तहसीलदार, आर्वी.