शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
4
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
5
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
6
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
7
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
8
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
9
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
10
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
12
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
13
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
14
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
15
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
16
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
17
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
18
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
19
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
20
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला

बिहाडीत अग्नितांडव, दोन घरे, तीन गोठे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:47 IST

तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.

ठळक मुद्देजीवनाश्यक साहित्याचा कोळसा, बैल होरपळला

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.बिहाडी गावात शुक्रवारी रात्री अचानक गावठाण शिवारात आग लागली. ही आग पसरत जाऊन संदीप, शरद व सुनील तुकाराम धांदे या भावंडांचे तीन गोठे जळून खाक झाले. यात गुरांचा चारा, शेतीसाहित्य जळाले. गोठ्यांना लागूनच महादेव तुळशीराम रेवतकर व आशा माणिक भोयर यांचे घर असून त्यांच्या घरांनाही आगेने आपल्या कवेत घेतले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य, अन्नधान्य भस्मसात झाले. माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग आटोक्यात येत नव्हती. आर्वी व पुलगाव येथून बोलविलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविल्याने पूढील अनर्थ टळला. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. जीवनावश्यक तथा शेतीपयोगी साहित्याचा कोळसा झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शनिवारी नायब तहसीलदार बर्वे, तितरे, मंडळ अधिकारी सांभारे, तलाठी गद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यात रेवतकर यांचे ३ लाख ५५ हजार, भोयर यांचे १ लाख ३५ हजार, संदीप धांदे ९७ हजार, शरद धांदे ९० हजार व सुनीलचे ६५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनास दिला.बकऱ्या विकून आणलेला गहूदेखील भस्मसातआशा भोयर ही विधवा महिला चार मुलींसोबत संसाराचा गाडा चालविते; पण शुक्रवारची रात्र त्यांना उद्ध्वस्त करून गेली. घरातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. बकऱ्या विकून विकत घेतलेला गहूदेखील आगीत स्वाहा झाला. रेवतकर यांच्या घरातीलही संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यामुळे दोन्ही कुटुंब उघड्यावर आले असून त्वरित शासकीय मदतीची गरज व्यक्त होत आहे.उदरनिर्वाहासाठी दिले धान्यशनिवारी पं.स. सभापती मंगेश खवशी यांनी बिहाडी गाठत पाहणी केली. यावेळी त्वरित आशा भोयर यांना निराधार योजनेतून आर्थिक मदत सुरू करावी, अशी मागणी तहसीलदारांना केली. खवशी यांनी दोन्ही कुटुंबांना उदरनिर्वाहाकरिता साखर, तांदूळ व अन्य किराणा त्वरित देण्यात आला.दोन जनावरे जखमीअचानक लागलेल्या आगीत गोठ्यात बांधून असलेली दोन जनावरे होरपळली गेली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने गोठ्यातील गुरे बाहेर काढण्यात आली. शिवाय भोयर व रेवतकर यांच्या कुटुंबातील सदस्य त्वरित घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :fireआग