शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

लावण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:24 IST

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमण झाले. शनिवारी अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच बळीराज पेरता झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ३२ मीमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमण झाले. शनिवारी अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच बळीराज पेरता झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. पाऊस येताच बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड होत आहे. तर सोयाबीन व इतर वाणांच्या पेरणीचे नियोजन सुरू आहे.जिल्ह्यात योग्य पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सावधगिरी म्हणून अद्याप पेरण्या केल्या नाही. पेरणी नंतर पाऊस बेपत्ता झाल्यास मोड येवून दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची वेळ येण्याशी शक्यता कृषी विभागाच्या सल्ल्यावरून दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर काही शेतकºयांनी कृषी विभागाचा हा सल्ला बाजूला ठेवत आपल्या अनुभवावरून पेरण्या सुरू केल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी शनिवारचा पाऊस येण्यापूर्वीच कपाशीची लागवड केल्याचे दिसून आले आहे. तर काही शेतकऱ्यांकडून आज रविवारी सकाळपासून लागवडीला प्रारंभ झाला आहे.पाऊस येण्यापूर्वी ज्या कापूस उत्पादकांनी कपाशीची लागवड केली त्यांची पेरणी साधल्याचे बोलले जात आहे. यात पावसाचा खंड पडल्यास शेतात असलेल्या ओलिताचा लाभ त्यांच्याकडून होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडूनच कपाशीची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे. तर शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि तुरीची लागवड अद्याप झाली नसल्याचे दिसत आहे. त्याला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सर्वत्र कपाशीच्या लागवडीला जोरमागील खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे यंदा कपाशीचे क्षेत्र घटेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात पाऊस येण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे.सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यातवर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात झाला आहे. येथे ६९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. वर्धा तालुक्यात ३७.४८, देवळी २३.६०, आर्वी ३६.१५, आष्टी १७.०३, कारंजा १४.५९, हिंगणघाट ४३ तर समुद्रपूर येथे १७ मीम पावसाची झाली आहे. याची एकूण बेरीज २५८.१३ मीमी असून त्याची सरासरी ३२ मीमी आहे. एवढा पाऊस पेरणीकरिता पुरेसा असल्याचे बोलले जात आहे.काही बियाण्यांनी बिटीतच मिसळविले नॉन बिटी तर काहींकडून वेगळी व्यवस्थाशासनाच्यावतीने यंदा कपाशीच्या बियाण्यांबाबत अधिकच सावधगिरी बाळगली गेल्याचे दिसून आले आहे. अनेक कंपन्यांना बाजारात विक्रीकरिता येत असलेल्या त्यांच्या वाणावर बंदी घालण्याच्या सूचना केल्या. बोंड अळीला बिटी आणि नॉन बिटीत झालेली गफलत एक कारण असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कपाशीची बियाणे विकणाऱ्या काही कंपन्यांनी त्यांच्या बिटी बियाण्यांतच नॉन बिटी मिसळविले आहे तर काही कंपन्यांकडून त्याची वेगळी पाकिटे देण्यात येत आहे. ही नॉन बिटी बियाणे शेताच्या धुऱ्यावर सभोवताल लावण्याच्या सूचना करण्यात आल्या असताना शेतकऱ्यांकडून तसे झाले नाही. यामुळे कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाल्याचे या कंपन्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.आर्थिक अडचण कायमच; अनेकांकडून अद्यापही बी-बियाण्यांची खरेदी नाहीयंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर जाहीर झालेली कर्जमाफी आणि त्यात व्याजाच्या रकमेवरून झालेला गोंधळ यामुळे अनेकांचा सातबारा कोरा झाला नाही. परिणामी त्यांना बँकांकडून नवे पिककर्ज नाकारण्यात आले. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणे कशी घ्यावी अशी चिंता पडली आहे. शिवाय तूर आणि चण्याचे चुकारे अडल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटल्याचे दिसत आहे. या आर्थिक अडचणीवर मार्ग काढून पेरणी साधण्याकरिता शेतकरी प्रचत्नरत आहे.

टॅग्स :agricultureशेती