बापाच्या व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी मुले मागतात भीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:06 PM2018-02-11T12:06:39+5:302018-02-11T12:09:16+5:30

वर्धा शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

Begging to ask the children to complete the dosage of father's addiction | बापाच्या व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी मुले मागतात भीक

बापाच्या व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासाठी मुले मागतात भीक

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धेतील वास्तवसंकल्प संस्थेने केलेल्या पाहणीतील धक्कादायक वास्तव

अभिनय खोपडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. अनेकदा महिला व पुरूषांच्या जवळ जावून त्यांच्या मागे लागून त्यांना भीक देण्यासाठी जबरदस्ती करताना ही मुले दिसून येतात. मात्र या केविलवाण्या चेहऱ्यांमागे लपलेले वास्तव खुप भयावह आहे. हे मुले आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वर्धा शहरात अनेक चौकात दररोज लहान मुल व मुली भीक मागताना दिसून येतात. साधारणत: गर्दीच्या ठिकाणी अशा मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. काही लोक दया म्हणून या मुलांना पैसे देवून मोकळे होतात. मात्र कुठलेही काम न करता फुकटात मिळणाऱ्या या पैश्यामुळे लहान मुलांच्या भीक मागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे स्वत:चे व आई-वडिलांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या भिकेच्या पैशाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. रोठा परिसरात मंगेशी मून यांनी उमेद संस्थेद्वारा संचालित संकल्प शाळा सुरू केली. या शाळेत अनेक मुल-मुली शिकायला येतात. येथे मंगेश (नाव काल्पनिक आहे) नावाचा एक मुलगा शिकण्यासाठी आणण्यात आला. त्याला सहा महिने झाले. तो तेथे राहू लागला. मात्र व्यसन सुटले नाही. दहा वर्ष वयाच्या या मुलाला व्यसनाने पछाडलेले आहे. आई-वडील हे दोघेही चारही मुलांना भीक मागून आणायला सांगतात. त्यातून ते आपले व्यसन भागवून घेत. सोबतच या मुलांना व्यसनाची सवय लागली. मंगेशसह शबनम (नाव काल्पनिक आहे) ही व्यसनाधीन झाले. शबनम तंबाखू खायला लागली. तर मंगेश दारू, खर्रा, तंबाखू, गांजा अशा अनेक व्यसनाच्या आहारी गेला. लहानपणापासून त्याला या गोष्टींची लत जडली. भिक्षा मागून मिळालेला पैसा याला कुठेतरी कारणीभूत ठरत आहे. सहा महिन्यानंतर मंगेश पहिल्यांदा शाळेतून पळून गेला. कारण वसतीगृहाचे वातावरण त्याला असह्य झाले. त्याच्याजवळ पैसा राहत नव्हता. तेथे व्यसनही करता येत नव्हते. म्हणून त्याने कुणालाही न सांगता वसतीगृहातून पळ काढला आणि वर्धा शहर गाठले. शहरातील एका चहा कॅन्टींग मध्ये तो लपून बसला. इकडे संकल्प संस्थेत मंगेश पळून गेल्याने खळबळ उडाली. त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम आखण्यात आली. त्यानंतर प्रकल्पातील मुले व या प्रकल्प चालविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता मंगेशी मून या त्याच्या शोधासाठी निघाल्या. मंगेशच्या बहिणीला त्याच्या लपण्याचा जागा ठाऊक असल्याने अखेरीस सोमवारच्या रात्री ११.३० तो सापडला. त्याच्या हाती पुन्हा भिक्षापात्र होते. ते रस्त्यातच फेकून देण्यात आले. त्याला प्रकल्पात परत आणण्यात आले. मात्र या घटनेने व्यसनाचा विळखा माणसाला कोणत्या थरापर्यंत नेऊ शकतो आणि यात कोवळ्या वयातील या मुलांचे बाल्य कसे खुरटले जात आहे याचा विचार करण्यास भाग पाडले आहे.


शहरात बालवयातील मुल भीक मागताना दिसून येतात. या मुलांना भीक देऊ नका. या भिकेच्या पैशातून हे मुले व्यसनाच्या विळख्यात ढकलेले जात आहेत. त्यामुळे समाजाने या मुलांना वही व पेन देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे.
- मंगेशी मून-पुसाटे
संचालक, संकल्प संस्था, रोठा

या संदर्भात कायद्यात कोणतेही प्रावधान नाही. मात्र पोलीस विभागाकडून विविध जनजागृतीपर मोहीम राबवून लहान मुलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हरविलेल्या मुलांबाबत विशेष मोहीम राबवून त्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षीत पोहचविण्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडली आहे. सध्या वर्धा शहरात हे प्रकार कमी असले तरी जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून ह्युमन ट्राफिकींग रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. नागरिकांनाही अशी बालके आढळल्यास त्वरीत पोलिसांना कळवावे.
- निर्मलादेवी एस.
पोलीस अधीक्षक, वर्धा.

Web Title: Begging to ask the children to complete the dosage of father's addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beggerभिकारी