शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादात रखडले स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण

By admin | Updated: December 2, 2014 23:12 IST

शहरालगत वर्धा नदीच्या काठावर कित्येक दशकापूर्वीपासून पंचधारा स्मशानभूमी आहे. शहरातीलच नव्हे तर शहर परिसर व दारूगोळा भांडारातील मृतकांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात.

पुलगाव : शहरालगत वर्धा नदीच्या काठावर कित्येक दशकापूर्वीपासून पंचधारा स्मशानभूमी आहे. शहरातीलच नव्हे तर शहर परिसर व दारूगोळा भांडारातील मृतकांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व्हावे, येथे अद्यावत सुविधा मिळाव्या यासाठी गत काही महिन्यांपासून दोन कोटी रुपये खर्चाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे; पण हक्क दाखविल्याने सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे मृतकावर अंत्यविधी करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
स्थानिक पंचधारा स्मशानभूमीत अद्यावत सुविधा नसल्या तरी कित्येक दशकांपासून गावाशेजारची स्मशानभूमी म्हणूनच याकडे पाहिले जाते. शहरालगतच्या या स्मशानभूमीत प्राचीन भोसले कालीन शिवमंदिर व या मंदिराच्या शेजारीच एक हनुमान मंदिर आहे. दशकापूर्वी या स्मशानभूमीत खासदार रामदास तडस यांच्या स्थानिक विकास निधीतून पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी तीन शेड व सोबतच्या नागरिकांना बसण्यासाठी एक मोठे टीनशेड उभारण्यात आले होेते. आतापर्यंत त्यातच अंत्यसंस्कार करण्यात येत होते; पण अलिकडेच या स्मशानभूमीच्या सांैदर्यीकरणाचा आराखडा माजी मंत्री आ़ रणजीत कांबळे यांच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपये खर्चाचा आराखडा आखण्यात आला. सौंदर्यीकरणाचे बांधकामही सुरू करण्यात आले़ यात अंत्यसंस्काराकरिता तीन शेड व विद्युत दाहिनी यासह नागरिकांना बसण्यासाठी शेड, प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, प्रसाधनगृह, पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींचा समावेश करण्यात आला.
या सौंदर्यीकरणाच्या कामास सुरूवात होऊन सुमारे अर्धे बांधकामही करण्यात आले. यानंतर अचानकच दारूगोळा भांडार प्रशासनाने जागेवर ताबा दाखवून काम थांबविल्याची चर्चा आहे; पण या जागेच्या वादात अंत्यसंस्कारास येणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात बांधकामाचे साहित्य पसरलेले आहे. बसण्यासाठी शेड नाही. संरक्षक भिंंतीमुळे नदीच्या पात्रात जाणे कठीण झाले आहे. या परिसरात कुठेही मोठे वृक्ष नाही. त्यामुळे उन्ह व पावसाचा मारा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. शिवाय हनुमान मंदिराजवळच बांधण्यात येत असलेल्या प्रसाधन गृहाबाबत नागरिकांद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. दारूगोळा भांडार प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने एकत्र बसून जागेचा वाद सोडवून काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)