गिरड ग्रामपंचायत : दुकानगाळ्यांचे लिलाव प्रकरणगिरड : ग्रामविकास आराखड्यातून निर्माण झालेल्या दुकानगाळ्याचा लिलाव नियमबाह्य झाल्याचा आरोप करीत येथील आरटीआय कार्यकर्ता निर्भय पांडे यांनी दुकानगाळ्यांसमोरच आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनाला गुरुवारी गटविकास अधिकाऱ्यांनी भेट दिली. या आंदोलनाला १६ दिवस होत आहेत. सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या नगरविकास आराखड्याच्या धर्तीवर जनसुविधेसाठी ग्रामविकास आराखड्यातून १२ व्यावसायिक दुकानगाळे बांधण्यात आले. ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपल्याच मनमर्जीतून दुकानगाळे लिलावाचा नियमबाह्य जाहिरनामा काढून धन दांडग्यांना लाखो रुपयात त्यांची विक्री केल्याचा आरोप पांडे यांनी केला. सदर लिलाव नियमबाह्य असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिले असूनही लिलाव थांबविण्यात आला नाही, असे म्हणत निर्भय पांडे यांनी शांतता आंदोलन सुरू केले. १५ दिवसाचा कालावधी लोटुनही स्थानिक प्रशासनाला जाग आली नाही. अखेर गुरुवारी (दि.१९ नोव्हेंबर) समुद्रपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. नियमानुसार कार्यवाही करून दुकानगाळ्याचे लिलाव रद्द करीत नव्या लिलावाचे आश्वासन दिले.(वार्ताहर)
शांतता आंदोलनस्थळी पोहोचले बीडीओ
By admin | Updated: November 20, 2015 02:31 IST