शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील साहूरच्या ‘रॅन्चो’ने विकसित केली बॅटरीवर धावणारी मोटारसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 21:37 IST

Wardha News कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असतानाच महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आष्टी तालुक्यातील साहूर येथील रॅन्चोने बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली.

ठळक मुद्दे८० किलोमीटरपर्यंत धाव क्षमताराहुलच्या कल्पकतेचे होतेय कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा  : कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असतानाच महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आष्टी तालुक्यातील साहूर येथील रॅन्चोने बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली. (A battery-powered motorcycle developed by Sahur's Rahul in Wardha district)

राहुल वामन वडस्कर असे या ध्येयवेड्या युवकाचे नाव. तो लहानपणापासूनच हुशार मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गावातच शिक्षण घेतले. आष्टी गाठत पुढील शिक्षण घेतले. त्यापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर ट्रेडमध्ये शिक्षण घेतले. नोकरी मिळावी म्हणून जिवाचा आटापिटा केला. मात्र, नोकरी मिळाली नाही. मात्र, यामुळे नाउमेद न होता राहुलने वडिलोपार्जित मोटर रिवाइंडिंगचा व्यवसाय कायम ठेवला. याच दरम्यान त्याच्यातील कल्पकता जागृत झाली. वाढत्या महागाईवर पर्याय म्हणून भंगारात पडून असलेली मोटारसायकल आणली. देशी जुगाड करीत बॅटरी, मोटर लावून अत्यल्प खर्चामध्ये बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली. ग्रामीण भागातील रॅन्चोने विकसित केलेली, बॅटरीवर धावणारी दुचाकी पाहण्याकरिता परिसरातील नागरिक गर्दी करीत असून राहुलचे कौतुक करीत आहेत.

पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून खर्च न झेपणारा आहे. गावोगावी फिरावे लागत असल्याने देशी जुगाड करून केवळ हजारांमध्ये ४ बॅटरीवर धावणारी दुचाकी तयार केली. बॅटरीवर तब्बल ८० किलोमीटरपर्यंत दुचाकी धावत असल्याने इंधनाचा खर्च वाचला आहे.

- राहुल वडस्कर, साहूर

टॅग्स :scienceविज्ञानJara hatkeजरा हटके