शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:35 IST

पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.

ठळक मुद्देबोर नदी : २० वर्षांपासून पाणी अडलेच नाही, लघुसिंचनची उदासिनता

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाऱ्यांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाऱ्यांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.घोराड गावानजीक बोर नदीवर शासनाने मोठा निधी खर्च करून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. परंतु, मागील २० वर्षांपासून त्यात पाणीच अडले नसल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांपैकी एका बंधाºयाची मागील चार महिन्यांपूर्वी नाममात्र डागडुजी करण्यात आली. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी पुढाकार घेऊन घोराड परिसरात बोरनदीवर हे बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सुरूवातीला या बंधाºयांमध्ये काही वर्ष पाणी अडले. त्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींच्या पाणीपातळीतदेखील लक्षणीय वाढ झाली होती. सद्यस्थितीत त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बंधारे सुस्थितीत राहावे याकरिता शेतकºयांची समिती तयार करण्यात आली होती; पण बंधारे बंद करण्यासाठी येणारा महागडा खर्च झेपणारा नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी ज्या विभागाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी आहे, तो विभाग सध्या बघ्याची भूमिकाच घेत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. विशेष म्हणजे, २० वर्षांपासून हे बंधारे हिवाळ्याच्या सुरूवातीलाच कोरडे होतात. या बंधाऱ्याच्या पाट्या गायब असून हे बंधारे बंद करण्यासाठी नव्याने साहित्यही संबंधित विभागाकडून आले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे शासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे निरुपयोगी ठरत असून यात शेतकºयांचे नुकसान होत आहे.डागडुजी नाममात्रकाही महिन्यांपूर्वी स्मशानभूमीजवळ असलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी बंधाºयात अडीच ते तीने फुटांच्या उंचीपर्यंत पाण्याची पातळी राहील, अशी व्यवस्था करण्यात आली; पण करण्यात आलेली डागडुजी किती काळ टिकेल, हे महत्वाचे आहे.उद्देशाला फासले जातेय हरताळशेतकरी सुजलाम्, सुफलाम् व्हावा या हेतूने तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी बोरधरण ते सेलूदरम्यान बोरनदीवर अनेक कोल्हापुरी बंधारे बांधले. यापैकी सेलू येथील एक बंधारा वगळता इतर बंधाऱ्यात पाणीच अडत नसल्याने बंधारे बांधण्याच्या उद्देशालाच खो मिळत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.जे मोठे आणि दुर्लक्षित बंधारे आहेत, त्याच्या दुरूस्तीसंदर्भाने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत लवकरच निर्णय होईल.- एच. पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई