शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बापूकुटी, आदीनिवासला शिंदूल्याच्या झांज्यांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:34 IST

देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात.

ठळक मुद्देआश्रमाचे पावसापासून संरक्षणासाठी पारंपरिक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात. या झांज्या सध्या स्मारकांसाठी कवच बनल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही पद्धत आजही कायम आहे.गांधीजी १२ वर्षांपर्यंत सेवाग्राम येथील आश्रमात राहिले. सेवाग्राम त्यांची कर्मभूमी व प्रयोगभूमी राहिली. देशातील सामाजिक व राजनितिक हालचालींचे हे केंद्र राहिल्याने सदैव कार्यकर्ता व देशातील प्रमुख नेते आश्रमात येत असतात. गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक साधन, साहित्य व कारागीर यांच्या माध्यमातून आश्रमात कुट्या तयार झाल्या. बापू व बा यांच्या कुट्या व दप्तर माती व कुडापासून बनविले असल्याने पावसाळ्यात संरक्षणाची व्यवस्था करावी लागते. त्या काळी याच शिंदोल्यांच्या झांज्या बांधल्या जात होत्या. आश्रमला ८२ वर्षांचा काळ झाला. आजही ही पंरपरा कायम आहे. आश्रम व्यवस्थापन आजही त्याच पध्दतीने कुटीचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे दिसून येते.काळ बदला. साधन साहित्यातही बदल होऊन काही समस्यांचा सामना व्यवस्थापकांना करावा लागत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या झांज्या दूर्मिळ होत चालल्या आहे. या वर्षी जुनोना या ठिकाणाहून शिंदोल्यांच्या पाणोळ्या आणाव्या लागल्या. काही जुन्या सुरक्षित ठेवलेल्या व काही नव्या अशांच्या झापड्या बनवून स्मारकांना लावण्यात आल्या. अनेक वर्षांची ही परंपरा आजही जोपासली जात आहे. सर्व स्मारकांना सुरक्षित ठेवून येणाऱ्या पिढीला गांधीजी आणि त्यांचा आश्रम पाहायला मिळावा, यासाठी आश्रम प्रतिष्ठान प्रयत्नरत आहे.आधुनिक साहित्याला नकारचमहात्मा गांधी या कुटीत राहावयास आले तेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून अत्यल्प खर्चात निवासाची सोय करण्याची अट त्यांनी ठेवली होती. त्या अटीनुसार येथे कुटी निर्माण झाली. आज विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत. या शोधात पावसापासून बचावाकरिता प्लास्टिक सारख्या वस्तू आहेत. असे असताना त्यांच्याकडून अशा कुठल्याही वस्तूंचा वापर येथे केला जात नाही. आजही जुन्याच पारंपरिक साहित्याच्या वापरातून कुटींचे रक्षण होत आहे.पर्यटकांसाठी खुलेआंतरराष्ट्रीय स्तरावरील व स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार आदिनिवासच्या वऱ्हांडा व गांधीजींच्या स्नानग्रुहाच्या छताच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले. ते पर्यटकांकरिता खुले करण्यात आले आहे. शिवाय पावसापासून बचावाकरिता नेहमीप्रमाणे पाणोळ्यांचे आवरण लावण्यात आले आहे.गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम बनविलेली कुटी म्हणजे आदिनिवास होय. ही कुटी बांबू, बोरा, बल्ली, कवेलू, माती आदींपासून बनविली होती. वास्तूची सुरक्षितता आश्रमसाठी महत्त्वाचा विषय आहे. पवसाळ्यात विषेश काळजी घेतली जाते.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी