शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:50 IST

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या नराधम बापास जिल्हा न्यायालयाने मृत्यूपर्यंत जन्मठेप ठोठावली. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी शनिवारी दिला.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : पाच हजार रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या नराधम बापास जिल्हा न्यायालयाने मृत्यूपर्यंत जन्मठेप ठोठावली. हा निकाल येथील विशेष सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी शनिवारी दिला.या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पीडिता तिच्या आजीच्या गावाला रहात होती. घटनेच्या पाच सहा दिवसापूर्वी आरोपी हा पीडितास शाळा सुरू होत असल्याच्या कारणाने तिला व तिच्या भावाला घरी घेवून आला. दरम्यान ३० जून २०१६ रोजी रात्री १४ वर्षीय पीडिता ही तिच्या लहान भावासोबत झोपली असता अर्ध्या रात्री नरसधम बापाने तिच्यावर बळजबरी केली.पीडिता ही १ जुलै २०१६ रोजी शाळेत गेली नाही. दुसऱ्या दिवशी ती शाळेत आल्यावर तिला तिच्या वर्ग शिक्षिका लोहकरे यांनी शाळेत न येण्याच्या कारणाची विचारणा केली. यावर ती काहीही बोलली नाही. शिवाय ती नाराज दिसत होती. शाळा सुटल्यावर पीडिता ही तिच्या वर्ग मैत्रिणीसोबत घरी परत जात असताना शाळेच्या कंपाऊंडमध्ये लोहकरे यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यामधल्या मजकूर वाचला असता लोहकरे यांना ती बाब अतिशय गंभीर वाटली. त्यांनी त्यांच्या इतर सहकारी शिक्षकांना सदर चिठ्ठी दाखविली व त्यानंतर गावातील सरपंचाकडे जावून त्यांना सोबत घेवून वर्ग शिक्षिकेने पोलीस सेवाग्राम पोलिसात या प्रकाराची तक्रार केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत तपास पूर्ण करून सहायक पोलीस निरीक्षक गजानन वासेकर यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. जी.व्ही. तकवाले यांनी एकूण ११ साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. त्यात पैरवी अधिकारी एएसआय मारोती कांबळे यांनी साक्षदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. साक्षपुराव्यावरून विशेष न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांनी सदर आरोपीला शिक्षा ठोठावली.आई-वडिलांच्या नात्यातील वितुष्टामुळे घटनाया प्रकरणामध्ये पीडिताची आई व वडील यांच्यात बºयाच वर्षांपासून वितुष्ट आले आहे. यामुळे पीडिता कधी तिच्या आईकडे तर कधी वडिलांकडे राहत होती. या प्रकाराचा गैरफायदा घेत आरोपीने सदर कृत्य केले. सदर घटनेची दखल वर्गशिक्षिकेने त्वरीत घेतल्यामुळेच आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल होवू शकला व सर्व साक्षदाराच्या सहकार्यानेच आरोपी सिद्ध होण्यास मदत झाली.

टॅग्स :Crimeगुन्हा