शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खरीप-रबीतील कर्जवाटपात बँका दिसताहेत निरूत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्यानेच लक्ष्यपूर्ती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देलक्ष्यपूर्ती निम्मीच । उद्दिष्ट ९८० कोटींचे, गाठले केवळ ६६ टक्के

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरिपासह रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात निरुत्साह दाखविल्याने लक्ष्यपूर्ती निम्मीच होऊ शकली. रबीची बऱ्यापैकी पेरणी आटोपूनही कर्जवितरणाचे प्रमाण केवळ २८.५७ टक्क्यांवर राहिले.खरिपात जिल्ह्यातील बँकांना ८८२ कोटी, तर रबी हंगामात ९८ कोटींचे उद्दिष्ट होते. मात्र, ४ लाख ५ हजार ६२८. ०३ हेक्टरवर पेरणी होऊनही खरिपात ३३२ कोटी तर रबी हंगामात केवळ २८ कोटी इतकेच कर्जवाटप झाले. लक्ष्यपूर्ती न झाल्याची कारणमिमांसा केली असता अनेकांनी कर्जाचे नूतनीकरण केले नाही, शिवाय अद्याप शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत असून मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने असलेली नापिकी, परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी पिकांचे झालेले नुकसान यामुळेच कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे कारण बँकांकडून पुढे केल जात आहे.जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्यानेच लक्ष्यपूर्ती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील अनेक भागात कापसाचे लागवडक्षेत्र मोठे आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकºयांनीच अधिक कर्ज घेतले.रबी हंगामात कर्जाची फारशी उचल झाली नाही. नापिकी, अस्मानी-सुल्तानी संकटांमुळे कर्ज फेडणे अवघड होत असताना, नवे कर्ज कशाला घ्यायचे म्हणूनही कर्ज घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आजही अनेक शेतकऱ्यांचा सावकारी पाश कायम असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचे अडेलतट्टू धोरणखरीप हा प्रमुख हंगाम असल्याने याकरिता मोठ्या प्रमाणावत निधी दिला जातो. रबी हंगामाकरिता निधीची तरतूद कमी असते. खरिपातील कर्जाची नियमित फेडणी झाली असेल तर बँकांकडून नवे कर्ज देण्याबाबत विचार केला जातो. अनेक बँका कर्ज वाटप करताना अडेलतट्टू धोरण राबवितात. यामुळे कित्येक शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करतात. त्यांच्याकडून बँकांची कानउघाडणीही केली जाते. मात्र, शासनाकडून आम्हाला निर्देश नाहीत. आम्ही काय करायचे म्हणून बँक व्यवस्थापने वेळ मारून नेताना दिसतात.

टॅग्स :bankबँक