शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी बँकेची आडकाठी; १४२ प्रस्ताव बँकेकडून रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 16:54 IST

१४२ प्रस्ताव केले रद्द : केवळ ९९ प्रस्तांवाना मंजुरी, १८८ प्रस्ताव बँकेकडे प्रस्तावित

चेतन वेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अन्नप्रक्रिया उद्योगक्षेत्रात 'व्होकल फॉर लोकल'ला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रक्रिया उद्योगासाठी कृषी विभागाच्या वतीने ३५ टक्के अनुदान देण्यात येते. गत दहा महिन्यांत ५४६ प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर झाले. यापैकी ४४६ प्रस्तावांना बँक कर्जासाठी बँकेकडे पाठिवण्यात आले. यापैकी केवळ ९९ प्रस्तांवाना मंजुरी दिली आहे, तर १४२ प्रस्ताव बँकेकडून रिजेक्ट करण्यात आले आहेत.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी ग्रामीण शहरी भागात दुजाभाव न ठेवता सरसकट प्रकल्प किमतीवर लाभार्थ्यांना ३५ टक्के अनुदान देण्यात येते. मोठ्या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. याशिवाय सामायिक पायाभूत सुविधा व ब्रेडिंग, मार्केटिंग यासाठीसुद्धा ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देय आहे. 

गत दहा महिन्यांत या योजनेअंतर्गत ऑनलाइन ५४६ हजार जणांनी नोंदणी केली होती. यापैकी कृषी विभागाला ४९४ प्रस्ताव सादर करण्यात आले. प्रस्ताव पुढे बँकेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ९९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून विविध कारणांमुळे १४२ प्रस्ताव बँकेकडून नाकारण्यात आले. तर १८८ प्रकरणे बँकेकडे कर्जासाठी प्रोसेसमध्ये असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. कर्ज देण्यात आलेल्यांनी प्रक्रीया उद्योग उभारले असून व्यवसाय जोरात सुरू आहे. 

२०२४-२५ साठी २९१ उद्योगांचे उद्दिष्ट जिल्ह्याला २०२३-२४ ला २९१ नवीन अन्नप्रक्रिया उद्योग, तर ४ सामूहिक उद्योग, १० कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर सेंटर उभारणीचे उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सामूहिक उद्योगाचे १०० टक्के पूर्ण केले. तर वैयक्तिक उद्योगाच्या उद्दिष्टाच्या पुढे काम करीत ३५८ प्रस्तांवांना कृषी विभागाने मंजुरी दिली. गतवर्षी वैयक्तिक उद्दिष्ट पूर्ण करीत कर्ज वितरणात टक्केवारी ११४ अशी राहिली होती.

येथे करता येतो अर्ज या योजनच्या कार्यालयीन वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अथवा जिल्ह्यातील ३५ जिल्हा संसाधन व्यक्तीकडे अर्ज करू शकतात. याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे उद्योगासाठी नोंद करता येते.

विभागात जिल्हा अव्वलअन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन कृषी विभागाने काम केले होते. गतवर्षी जिल्हा उद्योग उभारण्यात राज्यात तिसरा, तर नागपूर विभागात अव्वलस्थानी राहिला होता. 

तालुकानिहाय प्रस्ताव स्थितीतालुका           प्राप्त          रद्द            मंजूरी आर्वी               ३६              ०५               ०२ आष्टी               २४              ०४               ०६कारंजा             ५१              ०५               ०६ देवळी              ६९              १६               १०हिंगणघाट         १०७            ४३                १८  समुद्रपूर           ६२              २०                ०४ सेलू                 ८६              ३२                २० वर्धा                १११              १७                ३३

"नवीन उद्योग उभारणीसाठी अथवा व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी या योजनेतून अर्थसाह्य उपलब्ध करून दिले जाते. यात ९० टक्के बँक कर्ज देते. तर लाभार्थ्याला १० टक्के स्वयंहिस्सा ठेवावा लागतो. यावर ३५ टक्के अनुदान मिळते. शिवाय व्याजाचा परतावा सहायक विविध योजनेमार्फत घेता येतो. जसे- विकास कृषी पायाभूत सुविधा, ओबीसी महामंडळ, अण्णा भाऊ साठे आर्थिक महामंडळ आदी."- संजय डोंगरे, कृषी पर्यवेक्षक, कृषी कार्यालय वर्धा.

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा