शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बामर्डा पूल ठरतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: August 7, 2016 00:20 IST

धानोरा मार्गावरील बामर्डा येथील पूल महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला व वाहून गेला.

पुलाचे काम कोण करणार : ग्रामस्थांनी विचारला सवाल, वाहने जाताना बसतात हादरे हिंगणघाट : धानोरा मार्गावरील बामर्डा येथील पूल महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला व वाहून गेला. सध्या या पुलाच्या उर्वरित भागावरून वाहतूक सुरू असताना पूल हादरतो. या पुलाचे काम कोण करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या पुलावरून मार्गक्रमण करताना अपघाताची शक्यता बळावली आहे. पुलावरून वाहने जाताना पूल हादरून मोठा अपघात होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अपघात झाल्यावरच पुलाची दुरूस्ती होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वडनेर ते धानोरा या मार्गावरील बामर्डा येथील अरूंद व जीर्ण अवस्थेतील पुलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चंद्रपूर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही भरपूर आहे. यात भाविक रविवारी व बुधवारी वाहनांनी आजनसरा येथे भोजाजी महाराजांच्या मंदिरात दर्शनास येतात. या मार्गाच्या डागडुजीसाठी शासनाचा मोठा निधी खर्च करण्याचे नियोजन आहे. भूमिपूजनही नुकतेच करण्यात आले; पण दोन महिन्यांचा कालावधी लोटत असताना बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही. जीर्ण झालेला बामर्डा गावाजवळील पूल सततच्या पावसाने तुटून वाहून गेला. याकडेही एक महिन्यापासून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दोन वाहने रात्री या पुलावर आल्यास अपघात निश्चित आहे. शिवाय रहदारीचा रस्ता असल्याने धोका अधिकच वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)