शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कारची बैलबंडीला धडक पिता-पुत्रासह बैलजोडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:34 IST

नजीकच्या निमगाव (सबाने) येथील शेतकरी गोपाल बाबाराव मरघडे यांच्या बैलबंडीला मागाहून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात सालगडी किसना गोधनकर व मुलगा सचिन गोधनकरसह बैलजोडी गंभीर जखमी झाली. यामुळे शेतकºयाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. घटनेविषयी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या निमगाव (सबाने) येथील शेतकरी गोपाल बाबाराव मरघडे यांच्या बैलबंडीला मागाहून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात सालगडी किसना गोधनकर व मुलगा सचिन गोधनकरसह बैलजोडी गंभीर जखमी झाली. यामुळे शेतकºयाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. घटनेविषयी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, निमगाव येथील शेतकरी गोपाल मरघडे यांच्या शेतातील भुईमूग (शेंगदाणा) पिकाची काढणी सुरू आहे. निघालेले पीक बैलबंडीच्या सहाय्याने घरी आणण्याचे काम सुरू होते. रात्री ८.३० वाजतादरम्यान रिकामी बैलबंडी घेऊन शेंगदाण्याच्या शेंगा आणण्याकरीता गोधनकर पिता-पुत्र वर्धा-पुलगाव मार्गाने पुलगावच्या दिशेने जात असताना वर्ध्याकडून येणाºया एम.एच ०५ ए.एस ०७२३ कारने बैलबंडीला मागाहून जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की, बंडी अक्षरश: तुटली व बैलजोडीसह किसना गोधनकर (५५), सचिन गोधनकर (१३) गंभीर जखमी झालेत.जखमी पिता-पुत्रांना सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर बैलांवरसुद्धा पशुचिकित्सालयात उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे गोपाल मरघडे यांना जवळपास सव्वा ते दीड लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. यामुळे शेतकºयावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोडी व सालगडी जखमी झाल्याने शेती कशी करावी, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सावंगी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात