शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाज क्रांती मोर्चाची पालिकेवर धडक

By admin | Updated: June 18, 2017 00:39 IST

इंदिरा वसाहतीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा यासह अन्य

नगराध्यक्षांना निवेदन : समस्यांच्या निराकरणाची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : इंदिरा वसाहतीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा यासह अन्य मागण्यांकरिता बहुजन समाज क्रांती मोर्चा आयोजन समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील, नगर परिषद कार्यालयावर धडकला. नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती सुनीता बकाणे व सुनीता ताडाम यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले. जाती विरहित समाजव्यवस्था निर्माण करून महापुरूषांचे कार्य पूढे नेण्यासोबतच अन्याय अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे सांगण्यात आले. मोर्चाद्वारे इंदिरा वसाहतीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व वाचनालयाचे काम पूर्ण करण्यात यावे. शहीद अशोक गेडाम स्मारकाचे काम त्वरित करण्यात यावे, क्रांतीविर बिरसा मुंडा सभागृहाचे काम नियोजित जागेवर करण्यात यावे, दलित वस्तीतील खोटे ते बोडेकर यांच्या घरापर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्यात यावे. नगर परिषदेच्यावतीने चार ते पाच दिवसांआड करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. दलित वस्ती वॉर्ड क्र. ४ मधील कांजी हाऊसचे जीर्ण झालेले बांधकाम पाहून त्या ठिकाणी डॉ. आंबेडकर ज्ञान मंदिरचे बांधकाम व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. बसस्थानकावर शौचालयाचे बांधकाम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. न.प. परिसरातील अर्धवट नाली व रस्त्याची कामे, रस्ता दुभाजक व बंद पडलेले हायमास्ट सुरू करण्यात यावे आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चामध्ये न.प. सदस्य गौतम पोपटकर, दादा मून, मोहन गणवीर, आकाश खंडाते, हबीब गादीवाला यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने सामान्यांच्या समस्या गांभीर्याने घेत शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, हा संदेश दिला जात असल्याचेच दिसून आले.