शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नकार्य अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:21 IST

जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देअनेकांनी केले सोहळे रद्दतेरवी कार्यक्रमांवरही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहे. त्यामुळे वधू व वर पित्याच्या अडचणी वाढल्या आहे. मंगल कार्यालय, कॅटरर्स व इतर कामासाठी आगावू स्वरूपात दिलेली रक्कम परत कशी मिळवायची याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. मार्च महिन्या साधारणत: २९ व ३० मार्च या दिवशी लग्नांचा मोठा ठोक आहे. यासाठी सहा ते आठ महिन्यापूर्वीच मंगल कार्यालय, कॅटरर्स, लग्नबस्ते बूक करण्याचे व खरेदीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मार्च महिन्यात राज्यात कोरोना आजाराने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. राज्यात एक बळी या आजाराने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केले आहे.गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा स्थितीत लग्नकार्य मार्गी लावणे कठीण होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, असे अनेकजण विचारात पडले आहेत. तर काहींनी लग्न समारंभ, स्वागत समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलू येथील दफ्तरी परिवारातील स्वागत समारंभ याच पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती कुटूंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी तेरवी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील कोरोना आजाराची स्थिती कशी राहते यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून राहणार असून लग्न कार्य रद्द केले जात असल्याने यावर अवलंबून असणारे इतर अनेक व्यवसायही अडचणीत आले आहे. कॅटरर्स व्यवसायाला याचा फटका बसला असून वधू व वर पित्याचा लागलेला खर्च या पार्श्वभूमीवर पाण्यात जाणार आहे.

सार्वजनिक मिरवणूका, आंदोलनांवरही बंदीकोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मिरवणूका व सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लग्न समारंभात वरातीच्या मिरवणूका मोठ्या प्रमाणावर काढल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न वरातीही काढण्यास अडचण येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस