शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी वन विभाग वाघाच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:32 IST

नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोन चमू सज्ज : तालुक्यापासून १६ कि़मी. दक्षिणेस धुमाकूळ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी वाघाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेतीची विविध कामे ठप्प पडली आहेत. आर्वी वन विभागाच्या दोन चमू वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचा खात्रिदायक ठावठिकाणा या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. सदर वाघ वर्धा जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा असून वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आर्वी वन विभागाची १६ कर्मचाºयांची दोन चमू तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प परिसरात डोळ्यात तेल टाकून सध्या खडा पहारा देत आहे. इतकेच नव्हे तर ग्रा.पं., महसुल, पोलीस विभाग यांचेही त्याकडे लक्ष असून त्यांच्याकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर वाघास पिंजराबंद करण्याची मागणी शेतकºयांसह दहशतीखाली असलेल्या परिसरातील ग्रामस्थांची आहे.सोशल मिडियावरील चित्रफित बनावटबुधवारी सकाळपासून आर्वी तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईलमध्ये व्हॉटस् अ‍ॅप द्वारे वाघाबाबतची एक चित्रफित अनेक ग्रुपवर फिरत होती. या चित्रफित बाबत वन विभागाचे अधिकारी टुडे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणली असता त्यांनी ती बनावटी असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहनही केले आहे.मांडव्यात वाघाचा बैलावर हल्लाआकोली : वर्धा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मांडवा येथील विकास विद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या चिकराम यांच्या शेतात असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. यावेळी शेतातील नागरिकांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला. सदर घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली असून वन विभागाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. मांडवा येथील विकास विद्यालय हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. शिवाय ते गावालगत आहे. याच भागातील चिकराम यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर अचानक नाल्याच्या दिशेकडून आलेल्या वाघाने हल्ला केला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरड केली. यामुळे घटनास्थळावरून पळ काढून वाघाने नाल्या लगतच्या झुडपात आश्रय घेतला. सदरची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग