जागतिक आरोग्य दिन : सहाव्या महिन्यातच महिलेची प्रसूतीपराग मगर वर्धाआई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं; पण ते स्वप्न पूर्ण होत असताना आपलं बाळ निरोगी आणि पूर्ण वाढ झालेलं असावं, बाळात कुठलंही व्यंग असू नये, ही तिची मनोमन इच्छा असते. काही कारणास्तव गर्भाची वाढ होण्यापूर्वीच प्रसुती झाल्यास बाळाच्या जीवितास धोका असतो. असेच एक बाळ अवघ्या सहाव्या महिन्यात जन्मास आल्याने त्याचे वजन ८१० ग्रॅम होते. या नाजूक स्थितीत जन्मलेल्या बाळाला वाचविणे, हे एक दिव्यच; पण शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागाने हे आव्हान पेलले. त्या बाळाला जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.रुग्णालयातील बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सुनीता दीक्षित व त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांमुळे सदर बाळ जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. आज या बाळाचे वजन ८९० ग्रॅमपर्यंत पोहोचले. आतापर्यंत रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या लहान मुलांमध्ये हे बाळ सर्वात कमी दिवसांचे व वजनाचे असल्याची माहिती संबंधितांनी दिली. देवळी तालुक्यातील गौळ येथील वैशाली काकडे या महिलेची सहा महिने ११ दिवसांतच प्रसूती झाली. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी देवळी येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या प्रसूतीत हाडांचा सांगाडाच जणू जन्माला आला होता.
शर्थीच्या प्रयत्नांतून जगतेय अवघे ८१० ग्रॅम वजनाचे बाळ
By admin | Updated: April 7, 2016 02:11 IST