‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातील सामाजिक संघटनांसह आता महाविद्यालयेही नो व्हेईकल डे मध्ये सहभागी होऊ लागली आहेत. दुसऱ्या गुरूवारी सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. सदर महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास शहरातील दादाजी धुनिवाले मठ चौकात गोळा होत तेथून सायकलने महाविद्यालय गाठले. सायकलने महाविद्यालयात जात असताना सदर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी समजून नागरिकांमध्येही नो व्हेईकल डे आणि एक दिवस वाहने न वापरल्यास होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सायकल यात्रेत महिला प्राध्यापकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला.
बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालचा सहभाग
By admin | Updated: January 1, 2016 03:23 IST