शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीच्या उपोषण शस्त्राचा दुरूपयोग टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:45 IST

स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे.

ठळक मुद्देबापू कुटीसमोर युवा परिवर्तन की आवाजचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे. त्यांना सद्बुद्धी लाभो यासाठी शुक्रवारी वर्धेच्या युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेने आश्रमसमोर दिवसाचे उपोषण केले.सेवाग्राम आश्रम जगासाठी प्रेरणा देणारे असून गांधीजींनी याच आश्रमातून स्वातंत्र्य चळवळ अधिक प्रभावी बनविली. सत्य, अहिंसा आणि उपोषण हे बापूचे खरे शस्त्र. उपोषण व सत्याग्रहाला सत्य व अहिंसेचे बळ होते. यावरच जनतेची श्रद्धा व विश्वास असल्याने आंदोलनात देशवासी सहभागी झाले. अन्यायाविरुद्ध व मागण्यांसाठी बापूंनी उपोषण केले. यात प्रामाणिकपण होते. अलीकडे काँग्रेस व सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत गदारोळ केला म्हणून भाजपाने उपोषण केले. देशातील दोन मुख्य राजकीय पक्ष बापूंच्या सशक्त उपोषण मार्गाची टिंगल करीत असल्याचे दिसते. उपोषण कसे कराचे हे बापूंनी सांगितले. आणि बापूंच्याच आश्रम समोर युवा परिवर्तन की आवाज या संघटनाने उपोषण करुन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सद्बुद्धी लाभो यासाठी बापूंच्या उपोषणाचा मार्ग अवलंबिला. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टि.आर.एन.प्रभु यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. गांधीजींच्या प्रतिमेला सुतमाळ अर्पण करुन बापूंच्या मार्गाने युवक वाटचाल करीत आहे. त्यांच्या विचार व कार्यावर श्रद्धा असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.या उपोषणात युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हाध्यक्ष पलाश उमाटे, समीर गिरी, गौरव वानखेडे, शेखर इंगोले, अभिषेक बाळबुधे, सोनू दाते, सौरभ माकोडे, अक्षय बाळसराफ, स्वप्नील दौड आदी सहभागी झाले.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी