शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

२५ दिवसांपासून थांबलीत ऑटोची चाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २५ दिवसांपासून देशासह राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३,३४५ ऑटोरिक्षा। १४ हजार कुटुंबसंख्येवर ओढवले उपासमारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात साडेतीन हजारांच्या जवळपास ऑटोरिक्षा चालक आहेत. दररोज रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील प्रवाशांची ने-आण आणि विद्यार्थ्यांना शाळेत सोडून मिळणाऱ्या पैशावर आॅटोचालकांचा चरितार्थ चालतो. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २५ दिवसांपासून देशासह राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळाही बंद आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा आणि रेल्वेसेवाही ठप्प आहे. अनेकांचे पोट या व्यवसायावरच आहे. मात्र, २५ दिवसांपासून ऑटोची चाके जागीच थांबल्याने ऑटोचालकांचा हक्काचा रोजगार बनद झाला आहे.काही ऑटोचालकांनी बँकांचे कर्ज घेऊन ऑटोरिक्षाचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसाय ठप्प झाल्याने बँकेचा हप्ता कसा भरायचा, असा प्रश्न अनेक ऑटोचालकांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना विषाणूचा फटका ऑटोचालकांसोबतच तीनचाकी रिक्षाचालकांनाही बसला आहे.आर्थिक मदतीची चालकांची मागणीकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने २३ मार्चपासून लॉकडाऊनचा अंमल केला आहे. लॉकडाऊनला जवळपास महिना पूर्ण होत आहे. मागील पंचवीस दिवसांपासून शहरातील सर्वच ऑटोरिक्षा चालक घरीच बसून आहेत. अजून किती दिवस घरी बसावे लागणार, हेही सध्या सांगणे अवघड असल्याने ऑटोचालकांसह मालक चिंतित आहेत. अनेकांचा ऑटोवरच उदरनिर्वाह आहे. शासनाने ऑटोचालकांना आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे ऑटोचालक प्रकाश कुबडे यांनी सांगितले.अनेक ऑटोचालक उच्च शिक्षितवर्धा शहरात साडेतीन हजार ऑटोरिक्षा असून यातील अनेक ऑटोचालक-मालक उच्च शिक्षित आहेत. अनेकांनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, अपयशच आल्याने हताश होत अनेकांनी ऑटोव्यवसाय स्वीकारला आहे. या व्यवसायातील तुटपुंज्या मिळकतीतूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.बँकांचे हप्ते कसे भरावे?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील २५ दिवसांपासून ऑटोरिक्षा घरीच उभे आहेत. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन ऑटोरिक्षा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसायच ठप्प असल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे, असा सवाल ऑटोचालक रवी काळपांडे, धनराज शेलोकार, मनोहर कुबडे, पंकज झाडे यांनी केला आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा