सुर नदीवरील पुलाजवळील घटना आकोली : सेलू येळाकेळी मार्गावरील सुरगाव नजीकच्या सुर नदीवरील पुलाजवळ दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्नात आॅटो उलटला. ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले.जखमीत आॅटोचालक नामदेव रंगारी रा. कामठी व आॅटोतील एक महिला प्रवाशी महिलेचा समावेश आहे. दोन्ही जखमींना सेवाग्राम रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. नामदेव रंगारी हा त्याच्या मालकीचा एम.एच.३२ ए.३९६७ क्रमांकाच्या प्रवाशी आॅटोने जात होता. दरम्यान सूर नदीवरील पुलाजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात आॅटो उलटला. घटनेची माहिती गावात पोहोचताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.(वार्ताहर)
आॅटो उलटला; दोन गंभीर
By admin | Updated: March 6, 2017 00:59 IST