शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:28 IST

कधी नव्हे ते विदर्भात किटकशाकांच्या फवारणीने ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहे; पण सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली नाही.

ठळक मुद्देसुनील तटकरे : महात्मा गांधी आश्रमातील सभा

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : कधी नव्हे ते विदर्भात किटकशाकांच्या फवारणीने ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहे; पण सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली नाही. एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही. सरकारकडून शेतकरी व जनतेची फसवणूक झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने विदर्भातून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनात सरकारला जागं करण्याचं काम आम्ही करू, असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिले.सेवाग्राम येथे हल्लाबोल पदयात्रा पोहोचल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. हल्लाबोल पदयात्रा सेवाग्राम मेडिकल चौकात आली. सभेपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला आ. तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी हारार्पण केले.व्यासपीठावर आ. जयंत पाटील, जयदेव गायकवाड, राजेश टोपे, गुलाबराव देवकर, ख्वाजा बेग, हसन ुमुश्रीफ, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, चंद्रकांत पाटील, माजी आमदार गुलाबराव गावंडे, प्रा. सुरेश देशमुख, राजू तिमांडे, किशोर माथनकर, अ‍ॅड. सुधीर कोठारी, शरद देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, संदीप काळे आदी उपस्थित होते.तटकरे पूढे म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्रांती घडवून आणण्याचे काम केले. कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय त्यांनी घेतले. या महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व दिले. आज डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन असून त्यांनी या देशाला समानता आधारित लोकशाही दिली; पण धर्माचे राजकारण करणाºया सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच धोक्यात आणल्याचा आरोप करीत सरकारला घेरण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाची तिव्रता वाढली पाहिजे, असे सांगितले.आ. गायकवाड यांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशाचे संविधान तयार व्हावे यासाठी जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींनी बाबासाहेबांचे नाव सुचविले. त्यांनी देशाला सक्षम व प्रभावी लोकशाही निर्माण करणारी व लोकांचे राज्य व्हावे यासाठी राज्य घटना लिहून काढली. उद्देशिका समजावून घेतली तर या सरकारने गुजरातमध्ये एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. विदर्भात हल्लाबोल पदयात्रा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. सुरेश देशमुख म्हणाले की, माझा जन्म या भूमीत झाला असून येथे महात्मा गांधीजींचे वास्तव्य राहिले आहे; पण विकास झाला नाही. या सरकारच्या आश्वासन व धोरणामुळे शेतकऱ्यात निराशा पसरली आहे. त्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे.सभेचे संचालन समीर देशमुख यांनी केले. यावेळी पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.धनंजय मुंडेंना आडवा आला प्रोटोकॉलविरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांना बोलण्यास आग्रह करण्यात आला; पण पक्षाच्या अध्यक्षाचे भाषण झाल्यानंतर बोलण्याचा प्रोटोकॉल नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना सभेला मार्गदर्शन करता आले नाही. राष्ट्रवादी काँगे्रसची ही पदयात्रा गुरूवारी सकाळी ९ वाजता महात्मा गांधी आश्रम येथून निघून पवनारकडे रवाना होणार आहे. रात्री सेलू येथे यात्रेचा मुक्काम राहणार आहे.