शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम ठरतात ग्राहकांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: May 30, 2014 00:20 IST

आर्थिक व्यवहार करताना तासनतास रांगेत उभे राहून वेळ आणि श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने एटीएम सेवा देणे सुरू केले. बँकेकडूनही १५ ते २0 हजारांची रोख खात्यातून विड्रॉल करावयाची असल्यास एटीएम

वर्धा : आर्थिक व्यवहार करताना तासनतास रांगेत उभे राहून वेळ आणि श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने एटीएम सेवा देणे सुरू केले. बँकेकडूनही १५ ते २0 हजारांची रोख खात्यातून विड्रॉल करावयाची असल्यास एटीएम कार्डचा वापर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. कमी वेळात आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी म्हणून बँकेच्या अनेक ग्राहकांकडून या सेवेचा वापर केला जातो; मात्र ही सेवा दिवसेंदिवस ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे प्रत्ययास येत आहे. बरेचदा तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना या सेवेचा उपभोग घेता येत नाही. कधी एटीएम मशीनमधून रोकडच येत नाही, अशा स्थितीत ग्राहकांनी बँकेच्या कर्मचार्‍यांकडे मदतीची मागणी केली तर त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. याबाबत अनेक ग्राहकांनी नेवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमचा वापर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रक्कम खात्यातून विड्रॉल झाल्याचे दाखविण्यात येते. पण कॅश मात्र मिळतच नाही. या संदर्भात संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता ज्या बँकेच्या एटीएमच्या मशीनचा वापर केला तिथे तक्रार करा असा सल्ला दिला जातो. यानंतरही ग्राहक सुचनांचे पालन करतात. मात्र तिथेही कोणतीच मदत न मिळता रिकम्या हाताने परतावे लागते. बँकेच्या अधिकार्‍याकडून ही बाब आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून टोलवून दिले जाते. या सर्व प्रक्रीयेत बँकेत केवळ हेलपाटा मारण्याखेरीज हाती काहीच लागत नसल्याची स्थिती आहे. बर्चदा ग्राहकांची  तक्रार घेण्यास नकार दिला. जातो. शिवाय शहानिशा न करता त्यांना बँकेतून घालवून दिले जाते. यात ग्राहकांना नाहक नुकसान सोसावे लागत आहे. ग्राहकांच्या सुविधेकरिता तयार केलेली एटीएम सेवा आता ग्राहकांकरिता आता डोकेदुखी ठरत आहे. ग्राहकांनी यासंदर्भात तक्रार दिली तरी बँकेच्या कर्मचार्‍यांकडून बरेचदा हेटाळणी केली जाते. ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असे ब्रीदवाक्ये असलेल्या या बँकांमध्ये बरेचदा ग्राहकांना याउलट प्रत्यय येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील खातेधारक तासनतास रांगेत उभे राहूनच व्यवहार करण्यास पसंती देतात. एटीएम मशीनचा वापर करून वेळ वाचविताना मनस्ताप नाहक सहन करावा लागत आहे.(स्थानिक  प्रतिनिधी)