शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एटीएम फोडून ४० लाख लांबविले

By admin | Updated: November 5, 2015 02:20 IST

दिवाळसणाची लगबग व यामुळे होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेता बँकांच्या एटीएममध्ये कॅश लोड केली जात आहे.

गॅस कटरचा उपयोग : ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरटे सक्रियवर्धा : दिवाळसणाची लगबग व यामुळे होणारे आर्थिक व्यवहार लक्षात घेता बँकांच्या एटीएममध्ये कॅश लोड केली जात आहे. याचाच फायदा घेत वर्धा शहरात मंगळवारी रात्री गॅस कटरच्या साहाय्याने बोरगाव येथील बँक आॅफ इंडिया आणि प्रगती नगर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. यात जवळपास ४० लाखांची रोख चोरट्यांच्या टोळीने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. कुणाला संशय येऊन नये म्हणून एटीएमसमोर गाडी आडवी करून हा प्रकार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीमुळे खरेदीची लगबग वाढली आहे. नागरिकांना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी बँकांद्वारे एटीएममध्ये नियमित कॅ श लोड केली जात आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांच्या एका टोळीने मंगळवारी रात्री एटीएम मशीन फोडून रोकड लंपास केली. या चोरट्यांनी सर्वप्रथम बोरगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम फोडले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्रगती कॉलनीकडे वळविला. येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधूनही रोकड पळविली. एटीएम हे शस्त्राच्या साहाय्याने तोडणे शक्य नसते. हे आधीच ओळखून चोरट्यांंनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा उपयोग केला. तसेच एटीएम फोडताना ते कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणूच चोरट्यांनी शक्कल लढवित एटीएमसमोर मोठे वाहन आडवे लावून हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. कॅश लोड केल्यापासून आतापर्यंत किती रक्कम ग्राहकांद्वारे काढण्यात आली हे अद्याप कळू शकले नसले तरी दोन्ही एटीएममधून ३० ते ४० लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.(शहर प्रतिनिधी)एकाच रात्री दोन एटीएम फोडले४दोन्ही एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातून रोकड लंपास करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही चोरी एकाच प्रकारच्या असल्याचे निदर्शनास येते. तसेच एक किंवा दोघांकडून ही चोरी करणे शक्य नाही. त्यामुळे यात मोठी टोळी सक्रीय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ४एटीएमच्या सुरक्षेसाठी येथे रात्री सुरक्षा कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दोन्ही ठिकाणी हा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा एकदा एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही नोटा जळाल्या ४चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा उपयोग केला आहे. त्यामुळे एटीएम फोडताना काही नोटा जळाल्याचे समजते. पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट४घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे तसेच पथकाचा समावेश होता.