शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:51 IST

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे.

ठळक मुद्देकापसाची आवक अत्यल्प : अनेक समस्यांना द्यावे लागते तोंड

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे. बहुदा दसऱ्याला सितदही झाल्यानंतर दिवाळीत कापसाची बाजारपेठ फुलू लागते; पण मागील काही वर्षांत नैसर्गिक बदल, नापिकी, कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. या अस्मानी, सुल्तानी संकटामुळे शेतकरी तथा व्यापाºयांनाही फटका बसत आहे.शेतमाल खरेदी करणारा व्यापारी, शासनाने लादलेली नोटबंदी, सेवाकर व कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे त्रस्त आहे. यासह स्थानिक समस्यांचा सामनाही शेतकरी, व्यापाऱ्यांना करावा लागतो. परिणामी, कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक नसल्याचे चित्र शहरातील दोन्ही कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.शहरात पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सोरटा शिवारातील नर्मदा कॉटेक्स या केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. गुरूवारपर्यंत ३०२१.५६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून कापसाला सरासरी ४४०० ते ४६५० रुपये भाव देण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सुनील राजपूत यांनी दिली. शहरातील श्री साई स्कॉटपीन या खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत २५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. येथे कापसाला ४६५० ते ४७५० रुपये भाव देण्यात आला आहे. शासनाची नोटबंदी, जीएसटी, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचा फटका बसल्याने शेतकºयांकडून फारच कमी प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जात असल्याचे या केंद्रांच्या संचालकांनी सांगितले.केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले दहेगाव (धांदे) येथील शेतकरी राजू रंगारी व माणिक रामटेके यांनी समस्या कथन केल्या. शेतकºयांनी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागत आहे. उभ्या शेतमालावर निसर्ग व हानी पोहोचविणाºया किटकांचा उपद्रव, वाढलेली मजुरी, कापूस खरेदी केंद्रापर्यंत माल आणण्याचा खर्च पाहता शेतकºयाला खर्च व परिश्रमाच्या तुलनेत शेतकºयाला कापूस ३ हजार क्विंटल पडत असल्याच्या व्यथाही शेतकरी मांडतात. एकेकाळी शहरातील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाड्यांची रांग लागत होती; पण आज केवळ ३०० ते ५०० क्विंटलची आवक असल्याचे खरेदी केंद्रावर दिसून आले.दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदीपुलगाव शहरात दोन केंद्रांवर कापूस खरेदी केली जात आहे; पण या केंद्रांवर कापसाची आवक कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. आजपर्यंत दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांवर बºयापैकी भाव दिला जात असला तरी शेतकरी फारसा कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे दिूसन येत आहे. यामुळे कापसाची बाजारपेठ मंदावल्याचेच दिसते.