शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी शाळा-मैदानात RSS वर बंदी घाला! खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस म्हणाले, "अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
4
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
5
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
6
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
7
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
8
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
9
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
10
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
11
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
12
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
13
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
14
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
15
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
16
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
17
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
18
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
19
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
20
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

पिनकोड विचारून ४३ हजार काढले

By admin | Updated: March 17, 2016 02:43 IST

बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिन विचारला. यासाठी १६ फेबु्रवारी रोजी मोबाईलवर कॉल आला होता.

देलवाडी येथील प्रकार : अंगणवाडी सेविकेची फसवणूकआष्टी (शहीद) : बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमचा पिन विचारला. यासाठी १६ फेबु्रवारी रोजी मोबाईलवर कॉल आला होता. यानंतर खात्यातून प्रथम ४३ हजार २०४ व नंतर चार हजार रुपये परस्पर काढण्यात आले. हा प्रकार देलवाडी येथील अंगणवाडी सेविका शीतल राजू कोहळे यांच्याशी घडला. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार शीतल कोहळे यांना १६ फेब्रुवारी रोजी फोन आला. यात मी बँक मॅनेजर बोलतो. आपले एटीएम कार्ड बंद झाले आहे. पिनकोड व एटीएम कार्डच्या मागील नंबर सांगा, असे सांगितले. लक्षात न आल्याने त्यांनी माहिती दिली. यानंतर फसवणुकीची शक्यता लक्षात आल्याने १७ फेब्रुवारी रोजी ५ हजार रुपये काढले. यावेळी खात्यात ७१ रुपये होते. यानंतर १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता बँक आॅफ इंडिया अंतोरा शाखेत जाऊन घडलेला प्रकार बँक व्यवस्थापकांना सांगितला. यावेळी खाते लॉक करण्यास सांगितले. व्यवस्थापकांनीही लगेच खात लॉक केल्याचे सांगितले. यामुळे शीतल निश्चिंत झाल्या होत्या. यानंतर २ मार्च रोजी बचत गटाच्या लोनचे २९ हजार ८६५ रुपये जमा झाले. २ मार्च रोजी २ हजार रुपये मानधन जमा झाले. यानंतर ११ मार्च रोजी थकबाकी वाढीव मानधन ११ हजार ३३८ रुपये व १५ मार्च रोजी ४ हजार ५१० रुपये मानधन जमा झाले. खात्यात एकूण ४७ हजार ७०३ रूपये एवढी रक्कम जमा झाली होती. शीतल १५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता ४३ हजार २०४ रुपये चोरी गेल्याचे बँकेतून सांगण्यात आले. यावेळी खात्यात केवळ ४ हजार ५१० रुपये शिल्लक राहिले होते. यातून शीतल यांनी १६ मार्च रोजी ४ हजार रुपये काढले. सदर रक्कम कुणी काढली, याची चौकशी करून रक्कम खात्यात वळती करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा बँकेसमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पोलीस यंत्रणेनेही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.(प्रतिनिधी)