शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला शेततळे योजना लक्ष्यांकापासून दूरच

By admin | Updated: May 23, 2017 01:05 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली;

केवळ २८६ शेततळे : जिल्ह्याला दिले होते ३२०० शेततळ्यांचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली; पण प्रारंभी शेतकऱ्यांचा प्रतिसादच मिळत नव्हता. यामुळे वर्धा जिल्हा लक्ष्यांकापासून दूर आहे. ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत ३०० वर शेततळे पूर्ण झाले.कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेत वर्धा जिल्ह्याला ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेली योजना जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पचनी पडली नाही. केवळ ५० हजार रुपयांच्या अनुदानात सदर शेततळ्यांचे काम करायचे होते. परिणामी, लक्ष्य गाठताना कृषी विभागाला श्रम घ्यावे लागत आहेत. कृषी विभागाच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत २८६ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा ३०० वर गेला आहे. शिवाय सुमारे १५० वर शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यातील २ हजार ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी लागणारे सेवाशुल्क शेतकऱ्यांनी अदा केले आहे. हे सर्व प्रस्ताव निकाली निघाल्यास कृषी विभागाला उद्दिष्टाप्रत पोहोचता येणार आहे. जययुक्त शिवार अभियानातील कंत्राटदारांकडून शेततळ्यांची कामे करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.गैरप्रकार टाळण्याची गरजशेततळे योजनेत कंत्राटदारांकडून गैरप्रकार केले जात आहेत. तळ्यांच्या मोजमापात निकष डावलले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. खोलीकरणातून निघालेल्या माती, मुरूमाच्या ढिगाऱ्यावरून तळ्याची खोली मोजली जात असल्याच्या तक्रारी आहे. हा प्रकार कृषी सहायकही करीत असल्याची ओरड होत आहे. कृषी विभागातील वरिष्ठांनी या प्रकारांवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी स्वत:हुन शेततळ्यांची मागणी करीत आहे. ३०० वर तळे पूर्ण झाले असून १५० वर कामे सुरू आहेत. उर्वरित कामेही लवकरच हाती घेतली जातील. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.