शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधायला सांगितले,आता पैशाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:05 IST

ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिली किस्त प्रात्प होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.

ठळक मुद्देकोरोना संकटाचे दाहक वास्तव। लाभार्थ्यांसमोर आर्थिक संकटाचे डोंगर उभे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणून मोठा गाजावाजा करुन घरकुल योजना सुरू केली. पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी योजनेने अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न रंगविले. अनेकांनी योजनेच्या अधीन राहून हक्काच्या जागेवर बांधण्यास सुरूवातही केली. सुरुवातीला अनुदानाच्या किश्ती बरोबर मिळाल्या. पण, आता मात्र, अनुदानाच्या पुढील किश्ती मिळणे थांबले आहे. न मिळण्यामागे यंत्रणेचे उत्तर एकच, ते म्हणजे कोरोनाचे संकट.नगरपालिकेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेकरीता घरकुल मिळण्यास शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी अर्ज केले. यामध्ये टप्प्या-टप्प्याने अर्जांना मंजूरी देण्यात आली. ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिली किस्त प्रात्प होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. अगोदरच जीवनात विविध समस्यांचा सामना करणाऱ्या परिवारांना घर बांधताना अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यातील सर्व वाळूघाट मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने अव्वाच्या सव्वा दराने वाळू विकत घ्यावी लागली. कसेबसे बांधकाम स्लॅब लेव्हलला नेले. काही लाभार्थ्यांनी आपापले बांधकाम पूर्ण केले. योजनेच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप आणि नियमात बसवून सर्व शासकीय सोपस्कार आटोपले. पैसे मिळण्याची वेळ आली आणि अघटित घडले. कोरोना आजाराने शिरकाव केला. हे संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आणि जनजीवन विस्कळीत होवून सर्व चाके जागीच थांबली.एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासकीय कामे बंद आहेत. परिणामी, लाभार्थ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण आणि पेच निर्माण झाला आहे. अनेकांनी स्वत:चे झोपडीवजा घर मोडले. किरायाने राहणे सुरू केले. अशात अनेकांचे घरकुलही पूर्ण झालेले नाही. त्यात शासकीय अनुदानाची किस्त मिळणे थांबले आहे. ज्या दुकानदारांकडून बांधकाम साहित्य घेतले ते आता पैशाचा तगादा लावत आहेत. कारण त्यांनाही मोठ्या व्यापाºयांना पैसे द्यायचे आहेत.पावसाळा अवघ्या दीड महिन्यांवर आला आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही. जवळ असलेले पैसे काही घरच्या कामात उपयोगात आणाले, तर काही घरखर्चात निघून गेले. सध्या इकडे आड, तिकडे विहीर... अशी अवस्था शहरातील घरकुल लाभार्थ्यांची झाली आहे. शासनाने या समस्येचे तत्काळ समाधान करण्यासाठी शिल्लक रक्कम घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.लाभार्थी पूर्णत्वाच्या प्रतीक्षेतघरकुल योजनेमार्फत लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरूवात केली असता कोरोनामुळे कामे स्थगीत झाली. अशा परिस्थितीत निम्मेच कर्मचारी कामावर येत असल्याने अडचण निर्माण होत आहे. सर्व सुरळीत कधी होणार आणि घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक