शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी, तळेगावात पांढऱ्या सोन्याला मिळतो विक्रमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा  शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार  पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कापसाच्या अन्य बाजारपेठेच्या तुलनेत तोलाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा कापूस विकण्याकरिता खर्च लागत नसल्याने सुद्धा आर्वीच्या कापूस मार्केट बाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी :  आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर कापसाला दहा हजार ७० रुपये प्रतिक्विंटल भाव,  कापसाचा नगदी चुकारा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आणण्यास सुरुवात केली आहे. आर्वी तालुक्यात यावर्षी कापसाचा पेरा कमी प्रमाणात असल्याने मार्केट यार्डावर कापसाची आवक कमी प्रमाणात दिसत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.या वर्षी कापसाच्या उत्पन्नात सुद्धा काही प्रमाणात कमी आल्यामुळे सुद्धा  शेतकऱ्यांना कमी कापसाचे पीक झाले असल्याने सुद्धा कापसाची आवक कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात. आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार  पेठेत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला कापूस विकण्याकरिता आणल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कापसाच्या अन्य बाजारपेठेच्या तुलनेत तोलाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा कापूस विकण्याकरिता खर्च लागत नसल्याने सुद्धा आर्वीच्या कापूस मार्केट बाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. आर्वी उपविभागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. मात्र आर्वी बाजारपेठ इंग्रजकालीन कापूस बाजारपेठ म्हणून  प्रसिध्द आहे.

आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमधील येत असलेल्या कापसाचे दिवसेंदिवस भाव वाढत आहे.  कापसाला  १० हजार ७० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने येणाऱ्या दिवसात कापसाची आवक नक्की वाढेल आतापर्यंत ७३ हजार तीनशे वीस क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे.- विनोद कोटेवार, सचिव बाजार समिती, आर्वी 

सध्या तळेगाव येथील जिनिंगमध्ये दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या भावामुळे मी खूप समाधानी आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाल्यास  शेतीत केलेला खर्च वसूल होऊन नक्कीच शेती व्यवसाय  फायद्याचा ठरु शकतो. त्यामुळे आम्हाला भविष्यात कर्जबाजारी व्हावे लागणार नाही हे मात्र खरे..! - वैभव हरिभाऊ गेडामशेतकरी, धाडी, ता. आष्टी.

एम. आर. जिनिंग, प्रेसिंग फॅक्टरीमध्ये  दि. ३ व ४ जानेवारीला १० हजार रुपये दराने जवळपास सहाशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याकरिता शेतकऱ्यांना पाच अंकी आकड्यात कापसाचा भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.- गिरीष राठी,कापूस व्यापारी, तळेगाव (शा. पं.) 

पहिल्यांदाच कापसाला १० हजाराचा भाव

- तळेगाव (शा. पं.) : आष्टी तालुक्यातील तळेगाव येथील एम. आर. जिनिंगमध्ये इतिहासात पहिल्यांदाच  ३ व ४ जानेवारीला शेतकऱ्यांना १० हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. तळेगाव येथे जिनिंगमध्ये उच्च प्रतिच्या कापसाला सर्वाधिक भाव मिळत आहे. यावर्षी अतिपावसाने व बोंड अळीच्या पादुर्भावाने कापसाच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. त्यासोबत संपूर्ण राज्यासह देशामध्ये कापूस उत्पादन असलेल्या ठिकाणी कापसाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. तळेगावात खासगी जिनिंगमध्ये नववर्षानंतर  शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. 

 

टॅग्स :cottonकापूस