शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजार समितीचा राज्य पणन महासंघाकडे दीड कोटीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:48 IST

आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे.

ठळक मुद्देकृषी तारण योजनेसाठी

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना यावर्षीपासून शेतमाल खरेदीचा जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आर्वीतील व्यापाऱ्यांनी शासनाला जीएसटी रद्द करण्याची विनंती केली आहे. परंतु तसे न केल्यास व्यापारी शेतमाल खरेदी न करता संपावर जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे पाहून आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे. यात शेतकऱ्यांना तारण योजनेतून अधिक रक्कम देता यावी यासासाठी राज्य पणन महासंघाकडे दीड कोटीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.शासनाने शेतमाल खरेदीच्या तोंडावर अडते व व्यापाऱ्यांना पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शासनाच्या निर्णयाविरूद्ध बाजार समितीच्या अडत्यांनी विरोध केला आहे. व या निर्णयाबाबत शासनाने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. परंतु असे न झाल्यास बाजार समितीचे अडते व व्यापारी संपावर जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमिवर आर्वी बाजार समितीत गेल्या तीन दिवसापासून सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. रोज दोन हजार सोयाबीन पोत्यांची आवक बाजार समितीत सुरू आहे. १ आॅक्टोबर पर्यंत आर्वी बाजार समितीत ४०३० सोयाबीन पोत्यांची आवक झाली आहे. यात शेतकऱ्यांना शासनाने पाच टक्के जीएसटी (सेवाकर) लागू केल्याने अडत्यांनी याला विरोध करीत आर्वी बाजार समितीला निवेदन देवून याबाबत शासनाने सोयाबीन खरेदीवर लावलेला सेवाकर तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आर्वी बाजार समितीने कृषी पणन मंडळाची तारण योजना आर्वी तालुका व उपबाजार असलेल्या रोहणा, खरांगणा येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकऱ्यांना २८०० रूपये प्रति क्विंटल भावाने ६५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देऊन या तारण योजनेचा लाभ घेता येईल. यात तारणमध्ये ठेवलेला माल सोयाबीनचे भाव वाढल्यानंतर तारणमधून सोडवून विकण्याची मुभा शेतकऱ्यांना आहे. यातून शेतकऱ्यांना वाढीव बाजार भावाचा लाभ घेता येईल व सणासुदीची आर्थिक अडचण तारण योजनेच्या माध्यमातून भागविता येईल. ही योजना शेतकरी हित लक्षात घेऊन आर्वी बाजार समितीने सुरू केली आहे. तर दुसरीकडे जीएसटीच्या निर्णयामुळे व्यापारी नाखुश असल्याने सोयाबीन खरेदीकडे पाहिजे त्या प्रमाणात व कमी दराने खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. यात जीएसटी लावण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहिल्यास अडते संपावर जाण्याची चिन्हे असल्याने यात नाहक शेतकरी भरडल्या जाऊ नये यासाठी आर्वी बाजार समितीची शेतमाल तारण योजना सध्यातरी फायद्याची ठरणार आहे.

आर्वी बाजार समितीने कृषी पणन मंडळाची तारण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकरी हिताचा असून व्यापारी अडते यांच्या जीएसटीच्या पार्श्वभूमीवर परिणामकारक ठरणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शासनाने सेवाकराबाबत तातडीने निर्णय घ्यावा.- विनोद कोटेवारप्रभारी सचिव, बाजार समिती आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरी